
फोटो सौजन्य सोशल मीडिया
नागपुरातील श्रीधर महाराजांच्या माध्यमातून ११५ जणांचा जत्था २२ तारखेला नेपाळसाठी रवाना झाला. गोरखपूर येथून दोन टुव्हल्सनी २४ तारखेला काठमांडूला पोहचल्यानंतर धार्मिक विधी, महाशिवपूरणानंतर पर्यटन स्थळांना भेटी दिला. मात्र, नेपाळमधील महाप्रलयामुळे सर्वांना जीव मुठीत घेऊन दोन दिवस काढावे लागले.
खराब हवामान, उद्धवस्त झालेले रस्ते, दरड कोसळण्याचा धोका अशा परिस्थितीत अतिशय खडतर प्रवास नागपूरकरांना करावा लागला. तीन दिवसांतील विविध प्रसंगांमुळे त्यांच्या मनातील भीती अजूनही गेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रवाशांवरील ओढवलेल्या संकटाची दखल घेत यंत्रणा कामाला लावली आणि प्रवासी भारतात परतले.
Nagpur News : क्लोरीन वायू गळतीने पुन्हा उडाला थरकाप ;गोधनीनंतर शंकरपूर परिसरातील घटना
जत्थ्यातील चार प्रवासी शुक्रवारी २ वाजता विमानाने काठमांडूवरून सरळ दिल्ली येथे ४ वाजता पोहचले आणि रात्री ८ वाजता केरला एक्सप्रेसने निघाले, शनिवारी सकाळी ११.३० नागपूरला पोहोचतील. यात इंदिरा चौधरी, सुलोचना खापरे, दीपक पाडे आणि वर्षा उपाध्याय यांचा समावेश आहे.
जत्थ्यासोबत गेलेल्या ७२ वर्षीय निर्मला शेषमानी पांडे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शहीद गंगालाल नैशनल हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये पाठवले. त्यांची अॅन्जिओग्राफी झाली आहे.
Nagpur News : ११५ नागपूरकर नेपाळमध्ये ;मायदेशी निघाले पण बॅक टू काठमांडू
निर्मला पांडे यांची स्थिती आणि खर्च लक्षात घेऊन पुत्र रूपेश यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे एअर अॅम्बुलन्ससाठी विनंती केली. वैद्यकीय सेवेत मदत करण्याचेही निवेदनत नमूद केले. यावर मुख्यमंत्री कार्यालयाने काठमाडूचे खासदार संदीप राणा यांना कळवले आहे. रूपेश यांची बहीण वनिता तिवारी यांनाही अस्वस्थ वाटू लागले होते. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्याऱ्यांनी रूपेश यांची कॉन्फरन्सद्वारे तेथील एसडीएमशी बोलणे करवून दिले, सीतामढी येथे प्राथमिक उपचारानंतर त्याना सुटी दिल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी सर्व प्रवाशांना आणण्यासाठी पाटणा-नांदेड एक्सप्रेसमध्ये थर्ड एसीची स्पेशल कोच लावली आहे. सर्व प्रवासी शनिवारी सकाळी ७ वाजता निघणार आहेत. सर्व प्रवासी रविवारी पहाटे नागपूरला पोहचतील. प्रवाशांची आधी शुक्रवारच्या संघमित्रा एक्सप्रेसमध्ये व्यवस्था केली होती.