Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flash Flood: आंतरराष्ट्रीय मदतीबाबत बालेन शाह यांचा मोठा निर्णय; भारत आणि चीनकडे आपत्कालीन याचना

Nepal Flash Flood : नेपाळमधील विनाशकारी महापुरात आतापर्यंत ६२६ लोकांचा बळी गेला आहे. या विध्वंसाला प्रतिसाद म्हणून, नेपाळ सरकारने भारत आणि चीनकडे आपत्कालीन मदत आणि बचाव साहाय्याची विनंती केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 29, 2026 | 02:50 PM
Balen Shah Nepal flood international aid Nepal flood death toll 2026

Balen Shah Nepal flood international aid Nepal flood death toll 2026

Follow Us
Follow Us:
  • भीषण पूर आपत्ती
  • आंतरराष्ट्रीय मदतीबाबत मोठा निर्णय
  • भारताचे मोठे सहकार्य

हिमालयीन देश नेपाळमध्ये (Nepal Flash Flood)  पुन्हा एकदा निसर्गाच्या भयंकर कोपाने भीषण आपत्ती ओढवली आहे. चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशातून अचानक उगम पावलेल्या भोटेकोशी नदीच्या महापुराने नेपाळच्या मध्य आणि उत्तर भागांत भीषण तांडव घातले आहे. नदीपात्राने अचानक धारण केलेल्या विक्राळ रूपामुळे शेकडो गावे पाण्याखाली गेली असून, शनिवारी सकाळपर्यंत या विनाशकारी पुरात मृतांचा आकडा ६०० च्या पार पोहोचला आहे. पुराच्या भीषणतेमुळे शेकडो नागरिक अजूनही चिखल आणि ढिगाऱ्याखाली बेपत्ता असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध व बचाव कार्य सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीने संपूर्ण देशात हाहाकार माजवला असून नेपाळवर अत्यंत गंभीर संकट ओढवले आहे.

या महापुराचा सर्वाधिक फटका रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन, गोरखा, तनहुन, पूर्व नवलपरासी आणि पश्चिम नवलपरासी या जिल्ह्यांना बसला आहे. ‘द काठमांडू पोस्ट’ आणि स्थानिक पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चितवन जिल्ह्यात सर्वाधिक २३३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय पूर्व नवलपरासीमध्ये १५८, गोरखामध्ये ४८, पश्चिम नवलपरासीमध्ये ४७, धादिंगमध्ये ४५, नुवाकोटमध्ये ४१, तनहुनमध्ये ३१ आणि रसुवामध्ये १३ जणांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. नद्यांच्या काठोकाठ वाहणाऱ्या पाण्यामुळे तसेच चिखलाच्या दलदलीमुळे मृतदेह शोधण्यात बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात रस्ते, पूल आणि दळणवळणाची साधने पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने संपर्क तुटला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi: पंतप्रधान मोदींचा उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तानचा महत्त्वाचा दौरा; ‘कनेक्ट सेंट्रल एशिया’ धोरणाला मिळणार नवी गती

नेपाळ सरकारच्या धोरणात बदल; भारत आणि चीनकडे मदतीचे आवाहन

या भीषण आपत्तीचा सामना करताना सुरुवातीला पंतप्रधान बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ सरकारने स्वतःची सुरक्षा दले (नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस बल आणि नेपाळी सेना) बचावकार्यासाठी सक्षम असल्याचा दावा करत परदेशी पथके थेट तैनात करण्यास नकार दिला होता. मात्र, पुराची भीषणता, विस्कळीत झालेले दळणवळण आणि मोठ्या प्रमाणावर बेपत्ता असलेल्या नागरिकांची संख्या पाहता प्रशासनाला अवघ्या काही तासांतच आपल्या निर्णयात बदल करावा लागला. नेपाळ सरकारने आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून विशेष तंत्रज्ञान, आपत्कालीन मदत आणि मर्यादित शोध-बचाव साहाय्य स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे.

संकटाच्या या काळात शेजारील देश भारत आणि चीन यांच्याकडे नेपाळने मदतीचे आवाहन केले आहे. भारताने आपल्या ‘नेबरहुड फर्स्ट’ (शेजार प्रथम) धोरणाला जागून नेपाळला तातडीने मोठी मदत पुरवली आहे. भारताने मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR) अभियानांतर्गत ३७.५ टनांहून अधिक मदत साहित्य नेपाळकडे सुपूर्द केले आहे. यामध्ये तात्पुरती निवारे उभारण्यासाठीचे साहित्य, ब्लँकेट्स, आवश्यक औषधे, वॉटर प्युरिफायर आणि तयार अन्नाची पाकिटे यांचा समावेश आहे. याशिवाय रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी भारताने १० बेली ब्रिज (Baitley Bridges) देखील नेपाळला उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mohan Bhagwat : न्यूयॉर्कमध्ये गुंजला सनातन धर्माचा आवाज; ‘पळून जाऊ नका, कर्तव्य करा!; RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

तिबेटमधील ढगफुटी व हिमस्खलनामुळे महापुराचा उगम

नेपाळच्या पूर जगतातील तज्ज्ञांच्या मते, बुधवारी नेपाळच्या रसुवा सीमेवर आलेल्या या प्रलयंकारी पुराचा उगम चीनच्या तिबेट प्रदेशात झाला होता. तिबेटमधील ल्हेंदे नदीच्या वरच्या भागात झालेल्या हिमकडा कोसळण्यामुळे किंवा ढगफुटीमुळे नदीचा प्रवाह काही काळ अडवला गेला आणि त्यानंतर हा पाण्याचा प्रचंड साठा अचानक फुटून भोटेकोशी नदीद्वारे नेपाळच्या हद्दीत शिरला. पाणी इतक्या वेगाने आणि प्रचंड प्रमाणात खाली आले की, त्रिशुली आणि नारायणी नदीकाठच्या नागरिकांना सावध होण्याची संधीच मिळाली नाही.

सध्या बाधित भागांतून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे. लष्कराची हेलिकॉप्टर्स दुर्गम भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने उड्डाणे करत आहेत. ढिगाऱ्याखाली आणि नदीच्या पात्रात अजूनही अनेक जण अडकल्याची भीती असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय सध्या नेपाळच्या या दुर्दैवी आपत्तीवर लक्ष ठेवून असून मदतीचा हात पुढे करत आहे.

Web Title: Nepal flash floods death toll balen shah government india china aid marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Nepal Flash Flood
  • Nepal Flood
  • World news

संबंधित बातम्या

Gaza News : धक्कादायक ;गाझामध्ये इस्रायली गोळीबारात आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
1

Gaza News : धक्कादायक ;गाझामध्ये इस्रायली गोळीबारात आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

Nidal Hasan: अमेरिकेत पहिल्यांदाच फाशीचे लाइव्ह स्ट्रीमिंग; 13 जणांच्या मारेकऱ्याला सरकार सर्वांसमोर घालणार गोळ्या, काय आहे कायदा?
2

Nidal Hasan: अमेरिकेत पहिल्यांदाच फाशीचे लाइव्ह स्ट्रीमिंग; 13 जणांच्या मारेकऱ्याला सरकार सर्वांसमोर घालणार गोळ्या, काय आहे कायदा?

World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त
3

World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त

Starlink India: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी…’; इलॉन मस्क यांनी Mukesh Ambaniना पुन्हा डिवचले; केंद्र सरकारनेही दिले चोख प्रत्युत्तर
4

Starlink India: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी…’; इलॉन मस्क यांनी Mukesh Ambaniना पुन्हा डिवचले; केंद्र सरकारनेही दिले चोख प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.