
फोटो सौजन्य सोशल मीडिया
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पासाठी एकूण ६८३.७९ कोटी रुपये खर्च मंजूर आहे. त्यापैकी ४९४.६५ कोटी रुपये सिव्हिल बांधकामासाठी तर ६८.५० कोटी रुपये विद्युत कामांसाठी आहेत. आतापर्यंत ३५९.५० कोटींचा निधी प्राप्त होऊन वापर केला आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी २७४.२९ कोटींची तरतूद केली आहे.
प्रकल्पातील इमारतींचे बांधकाम विविध टप्प्यांत वेगाने सुरू आहे. स्पोर्टस क्लब, कॅन्टीन आणि अधिकारी निवासस्थानांचे आरसीसी काम पूर्ण झाले आहे. सध्या फिनिशिंगचे काम सुरू आहे. मल्टी-स्पोर्टस एरिना, कन्व्हेन्शन सेंटर आणि स्पोर्टस स्कूलचे कामही प्रगतिपथावर आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शिवाजी माने यांनी सांगितले.
Nagpur News : १०६ नागपूरकर आज पाटण्यावरून निघणार ;सीतामढी ठाण्यात पोहोचले
एकूण ७३,१२४ चौरस मीटर क्षेत्रफळात स्पोर्टस हबची उभारणी करण्यात येत आहे. प्रकल्पात एकूण ११ प्रमुख इमारती असतील, बांधकामाचे कंत्राट नागपूरच्या ‘सुपर कन्स्ट्रक्शन कंपनी’ला दिले आहे.
परिसरात स्पोर्टस क्लब, अॅथलेटिक्स भवन, क्रीडा वसतिगृह, जिम्नॅशियम, क्रीडा शाळा, क्रीडा विद्यापीठ, कन्व्हेन्शन सेंटर आणि क्रीडा संग्रहालयासह विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.
जलतरण तलावाची उभारणी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन, इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन आणि फेडरेशन इंटरनॅशनल डी व्हॉलिबॉलच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केली जात आहे. परिसरात ७ टेनिस कोर्ट, फुटबॉल व हॉकी पॅव्हेलियन तसेच १० लेनचे तिरंदाजी मैदान उभारण्यात येणार आहे. प्रकल्प ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेवर आधारित आहे. पावसाच्या पाण्याचे संधारण आणि आधुनिक पार्किंगची सुविधाही राहणार आहे.
Nagpur News : क्लोरीन वायू गळतीने पुन्हा उडाला थरकाप ;गोधनीनंतर शंकरपूर परिसरातील घटना
स्पोर्टस हॉस्टेलचे बांधकाम ११,७८३ चौरस मीटर क्षेत्रफळात होत आहे. येथे एकावेळी ४७० खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था असेल. इनडोअर फिटनेस सेंटर आणि आउटडोअर कोर्टची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
जिम्नॅशियम आणि प्रशासकीय इमारतीत इनडोअर स्पोर्टस हॉल, प्रेक्षक दालने, प्रशिक्षण क्षेत्र आणि प्रशिक्षकांसाठी स्वतंत्र जागा असेल. फुटबॉल आणि हॉकीसाठी स्वतंत्र पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहे. प्रत्येक स्टेडियममध्ये १,५०० प्रेक्षकांच्या आसनक्षमतेची व्यवस्था करण्यात येणार आहे.