फोटो सौजन्य सोशल मीडिया
जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने ‘डिजी यात्रा’ प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून, सर्व डिजी यात्रा सक्षम प्रवेशद्वारांवर आता ‘सिंगल स्टेप फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बोर्डिंग पास किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्याचा अतिरिक्त टप्पा आता राहणार नाही.
Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
यापूर्वी डिजी यात्रा अॅपवर नोंदणी केल्यानंतर त्यामध्ये बोर्डिंग पास जोडणे आवश्यक होते. विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रवेशद्वारावर प्रथम बोर्डिंग पास किंवा क्यूआर कोड स्कॅन केला जात होता. त्यानंतर कॅमेऱ्याच्या माध्यमातून चेहऱ्याची ओळख पटवल्यानंतर ई-गेट उघडत होते. नव्या व्यवस्थेत हा अतिरिक्त टप्पा वगळण्यात आला आहे. मात्र, प्रवाशाने डिजी यात्रा अॅपवर नोंदणी करून बोर्डिंग पास त्यावर शेअर करणे आवश्यक राहणार आहे.
Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका
आता प्रवासी डिजी यात्रा गेटसमोर पोहोचताच कॅमेरा त्याचा चेहरा ओळखेल. उपलब्ध माहितीशी पडताळणी झाल्यानंतर ई-गेट आपोआप उघडेल. या नव्या सुविधेमुळे प्रवेशद्वारांवरील रांगा कमी होण्यास आणि प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ वाचण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः प्रवेशद्वारापासून सुरक्षा तपासणी क्षेत्रापर्यंतचा प्रवास अधिक वेगाने पूर्ण करता येणार असल्याने विमानतळावरील प्रवासी अनुभव आणखी सुलभ होणार आहे.
Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
डिजी यात्रा प्रणालीतील सिंगल स्टेप फेस रिकग्निशन सुविधा हा प्रवाशांचा अनुभव सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. मानवी हस्तक्षेप कमी करून पडताळणी प्रक्रिया सुलभ केली आहे. प्रवाशांना सुरक्षित, कार्यक्षम आणि संपर्करहित प्रवासाचा अनुभव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नव्या व्यवस्थेमुळे बोर्डिंग पास स्कॅन करण्याचा टप्पा संपल्याने गेटवरील गर्दी आणि प्रतीक्षा वेळ कमी होईल. तसेच लोकांना होणार त्रास सुद्धा आता कमी होण्यास मदत होईल . आणि प्रवासात एक सहजता येईल .






