Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश

Nagpur News : नागपूर शहरात अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच मानकापूर चौकाजवळील पेंच-४ जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीसाठी पुन्हा २४ तासांचा शटडाऊन जाहीर करण्यात आला आहे. एकीकडे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसताना दुसरीकडे महापालिका आणि ओसीडब्ल्यूकडून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 11, 2026 | 02:19 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • नळ कोरडे, मग काटकसर तरी कशाची?
  • तर उन्हाळ्यात काय होणार?
  • संतापाचा होणार उद्रेक; रस्त्यावर येण्याची शक्यता
Nagpur News :नागपूर शहरातील अनेक भागांत अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एकीकडे नळाला पाणी येण्याची शाश्वती नसताना दुसरीकडे महापालिका आणि ओसीडब्ल्यूकडून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी वारंवार होणाऱ्या गळती, दुरुस्ती आणि शटडाऊनच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी नागरिकांनाच काटकसरीचे सल्ले देणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे.

मानकापूर चौकाजवळील पेंच-४ जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीसाठी मंगळवारी पुन्हा २४ तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

नळ कोरडे, मग काटकसर तरी कशाची?

शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटींचा फटका वारंवार नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी जलवाहिनीची गळती, कधी तांत्रिक बिघाड, तर कधी देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद केला जातो. ही कामे आवश्यक असली तरी त्यांचे योग्य नियोजन करणे ही महापालिका आणि ओसीडब्ल्यूची जबाबदारी आहे.

प्रत्येक वेळी शटडाऊन जाहीर करून नागरिकांना पाणी साठवण्याचे आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, अनेक भागांत आधीच पुरेसे पाणी मिळत नसताना अशा सूचनांचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे अपेक्षित असताना त्यांनाच वारंवार गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तात्पुरत्या दुरुस्त्यांऐवजी पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी दूर करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

Nagpur News : स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार

तर उन्हाळ्यात काय होणार?

उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार, जलसंतांवरील ताण वाढणार आणि त्याचवेळी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू राहणार असतील तर नागपूरकरांना पुन्हा मोठ्या पाणीबाणीला सामोरे जावे लागू शकते, मनपा आणि ओसीडब्ल्यूने आता केवळ शटडाऊनच्या सूचना आणि काटकसरीचे सल्ले देण्यापलीकडे जाऊन पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी कायमस्वरूपी दूर करण्यावर भर देण्याची गरज आहे.

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता

संतापाचा होणार उद्रेक; रस्त्यावर येण्याची शक्यता

पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या प्रश्नावर नागरिकांना वारंवार वेठीस धरणे योग्य नाही.
पाणीपुरवठा सुरळीत करा, मग काटकसरीचे घड़े द्या, एवढीच अपेक्षा नागरिकांची आहे.
पाणीबाणी लवकर संपवली नाही तर
आतापर्यंत घराघरांत व्यक्त होणारा संतापाचा उद्रेक होऊन लोक रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मनपा-ओसीडब्ल्यूने याची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे.

Web Title: Nagpur news another 24 hour shutdown conservation advised failure of nmc ocwcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
1

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा
2

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
3

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
4

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.