Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : जीवाची भीती ,रस्त्यांवर काढली रात्र ;जलशुद्धीकरणात क्लोरीन वायू गळती

Nagpur News : गोधनी नगरपंचायतीतीतील फागोजी ले-आऊटमधील जलशुद्धीकरण केंद्रात रविवार व सोमवारच्या मध्यरात्री क्लोरीन वायू गळती झाल्याने एकच दहशत पसरली. जीवाच्या भितीपोटी परिसरातील शेकडो नागरिकांनी घराला कुलूप ठोकून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. विशेष म्हणजे, अनेकांनी संपुर्ण रात्र रस्त्यांवर जागून काढली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 25, 2026 | 02:45 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • भोपाळ वायू दुर्घटनेची आठवण
  • रस्त्याकडे पळत सुटलो
  • रूबीचा गेला जीव
  • तरुणांनी दाखवले धाडस
Nagpur News :  मध्यरात्री सव्वा बारानंतर विषारी वायुगळतीचा अंदाज सर्वांनी व्यक्त केला. त्यानंतर काहीच मिनीटांत त्याचा त्रास जलशुध्दीकरण केंद्राला लागून असलेल्या फागोजी लेआऊटमधील रहिवाश्यांना झाला. या लेआउटमध्ये अंदाजे २०० च्या आसपास नागरिक राहतात.
या घटनेचा ‘आँखो देखा हाल’ सांगताना फागोजी ले-आऊटमधील रहिवासी सुरती भट म्हणाल्या, ‘रात्री जेवणानंतर घरातील बहुतांश मंडळी झोपी गेलो होतो.

मात्र, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अचानक मुलाला क्लोरीनचा वास येऊ लागला. त्याला डोळ्यात जळजळ, श्वास घ्यायला त्रास व उलट्‌या होऊ लागल्या. त्याने सर्वांना झोपेतून उठविले. लगेच काही वेळात आजूबाजूला आरडाओरड सुरू झाल्याचा आवाज आला. आम्ही लगेच दारे-खिडक्या बंद केल्या व तेवढ्या रात्री मुख्य दाराला कुलूप लावून सुरक्षित स्थळी गेलो .

जवळपास कुणीही नातेवाईक नसल्यामुळे नातवासह आम्ही सर्वांनी उघड्यावर रस्त्यावरच रात्र जागून काढली. मला आधीच किडनीचा त्रास आहे. त्यात दम कोंडल्यासारखे वाटल्याने जीव घाबरत होता. सोमवारी दुपारी ११.३० च्या सुमारास परिस्थिती साधारण
झाल्यानंतर आम्ही सर्व जण घरी परतलो. परंतु, अद्यापही त्रास सुरूच आहे’ असे भट यांनी सांगितले.

Nagpur News : स्फोटकांनी भरलेल्या व्हॅनला लागली आग;मोठा अनर्थ टळला

भोपाळ वायू दुर्घटनेची आठवण

भोपाळमध्ये काही दशकांपूर्वी झालेल्या विषारी वायुगळतीने अनेकांचे जीव गेले, गोधनीत झालेल्या या घटनेनंतरही अनेकांना भोपाळ वायुगळतीची आठवण झाली. मात्र, गोधनीतील घटना ही कमी तिव्रतेची व तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्याने नियंत्रणात राहीली, वेळीच पाण्याचा मारा शिवाय निसर्गानेही पावसाच्या रूपात मदत केल्याने वायुगळती वैगात पसरण्यावर मयाँदा आल्या.

रस्त्याकडे पळत सुटलो

या लेआऊटमधील अनेकांना झाला. सरस्वती सरोदे यांनीही घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली, त्या म्हणाल्या, मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास श्वसनाचा त्रास व डोळ्यात मिरची गेल्याप्रमाणे वाटू लागल्याने घरातील सर्व जण गोधनी रोडकडे पळत सुटलो. रस्त्यावर दोन-तीन तास काढल्यानंतर प्रभाव कमी झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता घरी परतलो.

रूबीचा गेला जीव

वायूगळतीमुळे फागोजी ले-आऊट परिसरात राहणाऱ्या राजू ढोणे यांना चांगलाच फटका बसला. या दुर्घटनेत त्याचा लाडका ‘रुबी’ नावाचा पांढऱ्या रंगाचा पाळीव कुत्रा मरण पावला. घरातील अन्य सदस्यांना वेळीच रुग्णालयात भरती करण्यात आले.

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत? ‘सत्ता काही कामाची नाही…’; नव्या पिढीबाबत मोठं वक्तव्य

तरुणांनी दाखवले धाडस

परिसरातील सुरेश सूर्यवंशी, आकाश कोलते, कार्तिक लक्षणे, गौरव लक्षणे, महेश यादव, स्वराज येलेकर व परिसरातील अन्य तरुणांनी धाडस व तत्परता दाखवून झोपेत असलेल्या फागोजी ले-आऊट व आजूबाजूच्या असंख्य नागरिकांना खासगी वाहनांनी सुरक्षितस्थळी हलविले, तसेच गंभीर अवस्थेत असलेल्यांना जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये भरती केले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या तरूणांनी वेळीच नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला, घर व सामानाची चिंता करू नका, आधी जीव महत्वाचा असल्याचे सांगत धीर दिला.

Web Title: Nagpur news fear for their lives residents spent the night on the streets chlorine gas leak at water purification plant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Emergency Situations
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला
1

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला

Pakistan Emergency: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणीनंतर गव्हर्नर हाऊस पेटवले; पोलिसांचा थेट गोळीबार, स्थिती हाताबाहेर
2

Pakistan Emergency: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणीनंतर गव्हर्नर हाऊस पेटवले; पोलिसांचा थेट गोळीबार, स्थिती हाताबाहेर

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज
3

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज

Pakistan Emergency: पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी अन् लष्कर तैनात; कराचीमध्ये कलम 144 लागू
4

Pakistan Emergency: पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी अन् लष्कर तैनात; कराचीमध्ये कलम 144 लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.