Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा

नागपुरात जेन झीशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील संघर्ष, लोकशाहीची ताकद आणि मोठ्या जबाबदाऱ्यांमधील दबावाचा सामना करण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला.

  • By विवेक
Updated On: Aug 23, 2026 | 02:46 PM
Devendra Fadnavis, Maharashtra Politics, BJP, Delhi Politics, Maharashtra News,

Devendra Fadnavis, Maharashtra Politics, BJP, Delhi Politics, Maharashtra News,

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जेन झीमधील तरुणांशी संवाद
  • भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते, असा विश्वास केला व्यक्त
  • सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्याचे राजकारण हे प्रभावी माध्यम – फडणवीस
 

नागपूर : देशाच्या राजकारणात सध्या ‘Gen Z’ हा अतिशय महत्वाचा विषय झाल्याचे दिसत आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील ‘Gen Z’ आंदोलनानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी ‘Gen Z’ ची ताकद ओळखून त्यांच्या प्रश्नांना महत्व दिले असल्याचे दिसत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ‘Gen Z’ सोबत संवाद साधून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष अधोरेखित केले. अध्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात ‘Gen Z’ सोबत संवाद साधत त्यांचे विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जेन झीमधील तरुणांशी संवाद साधताना आपल्या राजकीय प्रवासाबद्दल भाष्य केले. यासह यशानंतर येणाऱ्या दबावावरही भाष्य केले. मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि त्यासोबत मानसिक दबावही निर्माण होतो. मात्र, हा दबाव कसा हाताळायचा, याबाबत फडणवीसांनी त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

तरुणांना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याची इच्छा असणे ही सकारात्मक बाब असल्याचे सांगत फडणवीसांनी भारतीय लोकशाहीची ताकद अधोरेखित केली. आपल्या राजकीय प्रवासाकडे पाहताना मुख्यमंत्री होऊ, असा विचार सुरुवातीला कधीच केला नव्हता, असे त्यांनी सांगितले. राजकारणात प्रवेश केला त्यावेळी सत्ता मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. विरोधी पक्षात राहून आंदोलन आणि संघर्ष करण्यासाठीच राजकारणात आलो होतो, अशी आठवण त्यांनी सांगितली.

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद

आपला प्रवास नगरसेवकापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचला. त्यामुळे भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनात ठाम ध्येय असेल आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकते, असे फडणवीस म्हणाले.

दबाव कसा हाताळावा यावर केले भाष्य

दबावाबाबत बोलताना त्यांनी राजकारणाला व्यवसाय मानत नसल्याचे स्पष्ट केले. सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्याचे राजकारण हे प्रभावी माध्यम असल्यामुळे आपण या क्षेत्रात आलो, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी जीवनातील संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला. तरुण वयात आंदोलनांमध्ये सहभागी होताना अटक, पोलिसांचा सामना आणि तुरुंगवासाचा अनुभव आल्याचे फडणवीसांनी सांगितले. या संघर्षामुळे कठीण परिस्थितीचा सामना करण्याची मानसिक तयारी निर्माण झाली, असे त्यांनी नमूद केले.

यश मिळाल्यानंतर येणारा दबाव वेगळा असला तरी संघर्षाच्या काळातच त्याला सामोरे जाण्याची मानसिकता तयार होते, असा संदेश फडणवीसांनी यावेळी तरुणांना दिला. ध्येय मोठे ठेवण्यासोबतच त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

Web Title: Devendra fadnavis gen z nagpur political journey pressure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Gen Z
  • Nagpur News

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा
1

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा
2

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

Nagpur News :पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश
3

Nagpur News :पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
4

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.