Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

मुलताईजवळ कार चालकाला डुलकी लागल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नसावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. कार थेट ट्रकच्या मागील भागावर आदळली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2026 | 11:51 AM
ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला धडक; वृद्धाचा मृत्यू

ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला धडक; वृद्धाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

नागपूर : सिहोर येथील कुबेरेश्वर धामच्या दर्शनासाठी जात असलेल्या नागपूरमधील भाविकांच्या कारला मुलताईजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील भागावर आदळल्याने नागपूरच्या तिघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले. शनिवारी पहाटे बैतूल-नागपूर महामार्गावर हा अपघात घडला.

मृतांमध्ये बुटीबोरी येथील दीपक श्यामराव राऊत (वय ५५), पत्नी छाया दीपक राऊत (वय ५१) आणि प्रभा रामकृष्ण करदाते (वय ४८) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये नीता (वय ४०), नैतिक (वय १२), उज्ज्वला मोहन (वय ५२), संगीता (वय ४३) आणि सौरभ (वय ३०) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक राऊत आणि कुटुंबीय तसेच शेजारी कार (क्रमांक एमएच-४९ मधून सी-४७५६) सिहोर येथील कुबेरेश्वर धामच्या दर्शनासाठी निघाले होते. मुलताईजवळ कार चालकाला डुलकी लागल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नसावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार थेट ट्रकच्या मागील भागावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारचे पुढील चाक तुटून वेगळे झाले, तर छताचेही मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच मुलताई पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.

जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरात हलवले. या भीषण अपघातामुळे राऊत आणि करदाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

खड्डा ठरला काळाचा घाला

बालेवाडी-महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. ट्यूशनला जात असताना वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून जात होते. दुचाकी घसरल्यानंतर ११ वर्षीय ऋषभ पाटोळे हा मागून येणाऱ्या आयशर ट्रकखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेला हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Balewadi Mahalunge Accident News : खड्डा ठरला काळाचा घाला! ११ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Web Title: Three killed in horrific accident while on the way to visit a temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • Nagpur Crime
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत
1

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
2

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…
3

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
4

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.