Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार

Nagpur News : नागपुरात यंदा दिवाळीत फटाक्यांचा आवाज अधिक घुमण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने फटाक्यांच्या विक्री आणि वापराबाबत निर्बंध घातले असतानाही शहरातील फटाके विक्रीच्या परवान्यांची संख्या ८०० पार गेली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षात वाढणारी फटाके विक्री याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 17, 2026 | 02:42 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • रात्रीच्या आतिषबाजीवर लक्ष
  • सुगतनगर ,नरेंद्रनगर मध्येही वाढ
  • लकडगंज मध्ये सर्वाधिक वाढ
Nagpur News : दिवाळीत फटाक्यांच्या आवाजावर मर्यादा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असतानाच यंदा फटाक्यांच्या विक्रीसाठी अग्निशमन विभागाकडून मोठ्या संख्येने तात्पुरते परवाने दिले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा परवान्यांची संख्या वाढली आहे. तब्बल ८३१ प्रमाणपत्रे जारी झाली आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

अग्निशमन विभागाच्या २०१५ ते २०२६ या कालावधीतील आकडेवारीवर नजर टाकल्यास फटाक्यांच्या दुकानांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांच्या संख्येत वर्षांनुसार चढ-उतार झाल्याचे दिसून येते. २०१६ मध्ये सर्वाधिक ९८२ प्रमाणपत्रे देण्यात आली होती. त्यानंतर ही संख्या सातत्याने कमी होत वर्ष २०२० मध्ये ५८२ या नीचांकी पातळीवर पोहोचली.

मात्र, त्यानंतर पुन्हा वाढ सुरू झाली असून, गेल्या तीन वर्षांपासून प्रमाणपत्रांचा आकडा ८००च्या पुढेच आहे.गंजिपेठेत ५४ प्रमाणपत्रे गंजिपेठ अग्निशमन केंद्रातून २०१५ मध्ये ७७ आणि २०१६ मध्ये ७४ प्रमाणपत्रे देण्यात आली होती. वर्ष २०२० मध्ये ही संख्या ३५ वर आली. यंदा या केंद्रातून ५४ प्रमाणपत्रे जारी झाली आहेत.

सक्करदऱ्यात पुन्हा वाढ सक्करदरा केंद्रातून २०१५ मध्ये १८० प्रमाणपत्रे देण्यात आली. २०२३ मध्ये १७० आणि २०२४ मध्ये १७४ प्रमाणपत्रे जारी झाली होती. २०२५ मध्ये ही संख्या ९८ वर घसरली. यंदा मात्र पुन्हा वाढ होऊन १२३ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

London Protests: लंडनमध्ये आंदोलने! पार्लमेंट स्क्वेअरबाहेर भारत निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने, ध्रुव राठीचे समर्थक संघटित

रात्रीच्या आतिषबाजीवर लक्ष

उच्च न्यायालयाने रात्री १० वाजल्यानंतर फटाके फोडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात या वेळेचे काटेकोर पालन करणे प्रशासनासमोर आव्हान ठरणार आहे. रात्री १२ वाजल्यानंतर फटाके फोडल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे येत असतात. त्या कारवाईचा ताणही असणार आहे.

Yemen War: येमेनमध्ये युद्धाचा भडका! हुथींनी एडन विमानतळ अन् राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्रे डागली; 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी

सुगतनगर ,नरेंद्रनगर मध्येही वाढ

सुगतनगर केंद्रातून २०१५ मध्ये १४१ आणि वर्ष २०१६ मध्ये १५० प्रमाणपत्रे देण्यात आली होती. २०२० मध्ये हा आकडा ९३ झाला. यंदा ११० प्रमाणपत्रे जारी झाली आहेत. नरेंद्रनगर केंद्रातून २०१८ मध्ये सर्वाधिक १८५ प्रमाणपत्रे देण्यात आली होती. २०२० मध्ये ही संख्या ६९ वर आली, त्यानंतर २०२५ मध्ये १०७ आणि यंदा १२८ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

लकडगंज मध्ये सर्वाधिक वाढ

लकडगंज केंद्रातून २०१५ मध्ये ८१ प्रमाणपत्रे देण्यात आली होती. २०२४ मध्ये हा आकडा १३६, २०२५ मध्ये १५४ आणि यंदा १५७ वर पोहोचला आहे.

Web Title: Nagpur news firecracker noise set to increase this year number of licenses crosses 800 despite high court order cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • Firecracker
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू
1

Thane News: ठाणेकरांसाठी फॅशनची गुड न्यूज! युनिक्लोचं पहिलं स्टोअर लेक शोअरमध्ये सुरू

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released:  प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
2

Sunday 1996 Marathi Movie Trailer Released: प्रत्येक उत्तरातून उभा राहणार नवा प्रश्न! ‘संडे १९९६’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम
3

Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
4

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.