Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता

World News : नायजेरियन तरुण कार्यकर्ता सोसा हेन्कोमा २५ वर्षांहून अधिक काळ बेपत्ता असलेल्या आईचा शोध घेण्यासाठी नायजेरियात परतले आहेत. मानवी तस्करी आणि बालशोषणातून बचावलेल्या सोसा यांचा हा प्रवास आता 'Where Roots Lie' या माहितीपटातून जगासमोर येत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 22, 2026 | 04:41 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • आईचा शोध घेण्यासाठी नायजेरियात परतला तरुण
  • शोषणाच्या अंधारातून कार्यकर्त्यापर्यंतचा प्रवास
  • Where Roots Lie मधून संघर्षाची कहाणी जगासमोर
World News : नायजेरियातील तरुण कार्यकर्ता आणि शोषणातून बचावलेले सोसा हेन्कोमा गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ आपल्या आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत . आई अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मनात अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले . मात्र इतकी वर्ष उलटूनही या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळेलेली नाहीत . आता आईचा शोध घेण्यासाठी आणि तिच्या भूतकाळातील धागेदोरे जोडण्यासाठी त्यांनी पुन्हा नायजेरियाचा प्रवास केला आहे .

आईचा शोध घेण्यासाठी नायजेरियात परतला तरुण

सोसा यांचा जन्म नायजेरियात झाला असून त्यांचे बालपण ब्रिटनमध्ये गेले . लहान वयातच त्यांची आई त्यांच्यापासून दूर झाली . त्यानंतर आईशी संपर्क तुटल्याने तिच्याबाबतची माहिती मिळवणे कठीण झाले आहे . ज्यांची आई युरोपमध्ये जाण्याचा प्रयत्नात असताना बेपत्ता झाली असल्याचे समोर आले आहे .

त्यामुळे तिच्यासोबत नेमके काय घडले , ती गेली कुठे आणि तिचे पुढे काय झाले , असे अनेक प्रश्न आजही विना उत्तराचे राहिले आहेत .आता नायजेरियात परतल्यानंतर ते आईकडील नातेवाईकांची भेट घेऊन जुन्या आठवणी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तिचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहे .

Lewis Pugh : होर्मुझमध्ये आकाशात लढाऊ विमाने आणि समुद्रात जळणारे टँकर; जीव धोक्यात घालून ब्रिटिश जलतरणपटू पोहला 15 किमी

शोषणाच्या अंधारातून कार्यकर्त्यापर्यंतचा प्रवास

सोसा यांचा स्वतःचा प्रवासही संघर्षांनी भरलेला आहे . ब्रिटनमध्ये बालपणी त्यांना अत्याचार , टोळ्यांकडून होणारे शोषण आणि हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे . किशोरवयात ते गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात आले आणि त्यांना तुरुंगात ही जावे लागले . पुढे त्यांची मानवी तस्करी आणि शोषणाचे बळी म्हणून ओळख पटली .

या कटू अनुभवातून बाहेर पडत त्यांनी आपले आयुष्य बदलले . आज ते मानवी तस्करी आणि बालशोषणविरोधात जनजागृती करणारे कार्यकर्ते म्हणून काम करतात . शोषणाला बळी पडलेल्या मुलांच्या संरक्षणासाठी ते आता आवाज उठवत आहेत .

Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह दिल्लीत दाखल; उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींशी होणार महत्त्वाची चर्चा

Where Roots Lie मधून संघर्षाची कहाणी जगासमोर

सोसा यांच्या या प्रवासावर Where Roots Lie; Surviving Child Grooming and Exploitation हा माहितीपट तयार करण्यात आला आहे . दिग्दर्शक समीर मोदी यांनी या माहितीपटातून सोसा यांचा आईच्या शोधाचा प्रवास मांडला आहे . हा केवळ एका मुलाने आपल्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न नाही तर मानवी तस्करी , बालशोषण , स्थलांतर आणि स्वतःच्या मुळांचा शोध घेणारी कहाणी आहे .

आईचा शोध घेताना सोसा यांना आपल्या कुटुंबाशी पुन्हा जोडले जाण्याची आशा आहे . मात्र त्यांच्या आईबाबत नेमकी माहिती मिळाली आहे कि नाही , याचा खुलासा उपलब्ध माहितीमध्ये झालेला नाही . त्यामुळे त्यांच्या शोधाचा पुढील प्रवास महत्वाचा ठरणार आहे .

Web Title: World news nigerian activist searching for missing mother cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Human Trafficking
  • Marathi News
  • Missing Case
  • Nigeria News

संबंधित बातम्या

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
1

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी
2

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…
3

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…

Alka Kubal Daughter Engagement: मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई! लाडक्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा, फोटो पाहिलेत का?
4

Alka Kubal Daughter Engagement: मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई! लाडक्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा, फोटो पाहिलेत का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.