Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला

Nagpur News : हेल्मेट वापरण्याबाबत वाहनचालकांमध्ये जागरूकता वाढत असली, तरी अनेकजण हेल्मेट घालून कानात इअरफोन लावून वाहन चालवताना दिसत आहेत. गाणी ऐकण्याच्या किंवा फोनवर बोलण्याच्या नादात वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. त्यामुळे हॉर्न, रुग्णवाहिका आणि इतर वाहनांचे आवाज ऐकू येत नाहीत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 12, 2026 | 04:18 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • कडक नियम, परवाना रद्द करण्याची कारवाई
  • जनजागृतीतूनच बदल शक्य
  • ऑटो आणि ई-रिक्षाचालकही आघाडीवर
Nagpur News: शहरातील वाहतुकीचा वेग वाढत असताना अपघातांना निमंत्रण देणाऱ्या नव्या सवयीही वाढू लागल्या आहेत. दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याबाबत अनेक वाहनचालक जागरूक झाले असले तरी त्याच वेळी कानात ब्लूटूथ इअरफोन किंवा इअरफोन लावून वाहन चालवण्याचे प्रमाणही दिसून येत आहे. याला ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’ असे म्हटले जात आहे. ही सवय ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षाचालकांमध्येही दिसत असल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शहरातील सीताबर्डी मुख्य मार्ग, लॉ कॉलेज चौक, विद्यापीठ परिसरातील रस्ते आणि वर्धा मार्गासह अनेक वर्दळीच्या ठिकाणी इअरफोन घालून वाहन चालविणारे दिसतात. विशेषतः तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ही सवय अधिक आढळते. इअरफोनमुळे हॉर्न, रुग्णवाहिकांचे सायरन आणि इतर वाहनांचे आवाज ऐकू येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

मोबाइलवरील संभाषण किंवा संगीतामुळे लक्ष विचलित झाल्यास अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला प्रतिसाद देण्यास विलंब होण्याची शक्यता असते.नियमभंगाला आळा घालण्याचे आव्हान वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून विविध मोहिमा राबविल्या जातात. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. मात्र, इअरफोन वापरून वाहन चालविण्याच्या प्रकारावर नियंत्रण ठेवणे हेही महत्त्वाचे आव्हान ठरत आहे.

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज

कडक नियम, परवाना रद्द करण्याची कारवाई

वाहन चालवताना मोबाईल किंवा ईअरफोनचा वापर : मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार, वाहन चालवताना मोबाईल किंवा इंअरफोनचा वापर केल्यास ५ हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास न्यायालयामार्फत वाहनचालक परवाना रद्द करण्याची कारवाईही होऊ शकते.

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ व १९४डी नुसार दुचाकीचालक आणि मागे बसणाऱ्यास हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजारापर्यंत दंड आणि वाहनचालक परवाना निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते.

जनजागृतीतूनच बदल शक्य

वाहतूक पोलिसांकडून कितीही तपासणी केली किंवा ई-चलनाद्वारे दंड आकारला, तरी वाहनचालकांच्या सवयी बदलल्याशिवाय या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळविणे कठीण आहे. वाहन चालवताना इअरफोनचा वापर टाळणे, मोबाईलवरील संभाषणासाठी सुरक्षित ठिकाणी वाहन थांबविणे आणि वाहतुकीकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी हेल्मेटचा वापर जितका महत्त्वाचा आहे, तितकेच वाहन चालवताना इअरफोनपासून दूर राहणेही आवश्यक आहे.

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

ऑटो आणि ई-रिक्षाचालकही आघाडीवर

दुचाकी चालकांप्रमाणेच ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षाचालकांमध्येही इअरफोन वापरून वाहन चालविण्याची सवय दिसून येते.
प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष रस्त्याऐवजी मोबाईल किंवा संगीताकडे असल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो.वाहतूक सिग्नल, पादचारी, अचानक समोर येणारी वाहने आणि लेनमधील बदल याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.काही चालक संथ गतीने किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन चालविल्याने मागील वाहनांची कोडीही होते. त्यामुळे चालकाच्या वैयक्तिक सवयीचा फटका इतर वाहनचालक आणि प्रवाशांनाही बसू शकतो,

Web Title: Nagpur news helmet on the head earphones in the ears musical driving increases the risk of accidentscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Road Safety

संबंधित बातम्या

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
1

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
2

Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज
3

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज

Dhule News: “मागण्या मान्य होईपर्यंत तलावातून बाहेर पडणार नाही!” धुळ्यात शेकडो आदिवासींचे जलसमाधी आंदोलन
4

Dhule News: “मागण्या मान्य होईपर्यंत तलावातून बाहेर पडणार नाही!” धुळ्यात शेकडो आदिवासींचे जलसमाधी आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.