Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

M-indicator: मुंबईकरांच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग असलेल्या M-Indicator अॅपवरील मजेशीर चॅटचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रवाशांना ट्रेनचा उशीर, गर्दी आणि प्रवासासंबंधी माहिती देण्यासाठी असलेल्या चॅट पर्यायाचा वापर अनेक जण गप्पा, विनोद, तक्रारी आणि दुकानांच्या जाहिरातींसाठी करत असल्याचे दिसते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 12, 2026 | 04:02 PM
M-indicator (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

M-indicator (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • M-Indicator वरील मजेशीर चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल
  • ट्रेनचा उशीर, गर्दी आणि प्रवासाची माहिती एकमेकांना देण्यासाठी हा पर्याय
  • मोबाईल हरवणे, ट्रेनमधील गर्दी आणि प्रवासासंबंधी प्रश्नांवर मजेशीर उत्तरे
M-Indicator Chat Goes Viral: मुंबईकर आणि M-Indicator चे नाते काय आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मुंबईत लोकल, बस किंवा मेट्रो तिकिट काढायचे असेल तर सगळे आधी M-Indicator उघडतात. घरातून निघायच्या आधी एकदा अॅप बघितले की सगळा प्रवासाचा प्लॅन क्लिअर होतो.

पण हे अॅप आता फक्त टाइम बघण्यासाठी राहिलेले नाही. लोकांनी या अॅपला जाणून काही सोशलमीडियाचा वापर केल्यासारखा वापर करत आहेत. अगदी व्हॉट्सअॅप सारखे चॅटिंग तिथे सुरु असून याच चॅटचे काही स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ते वाचून तर पोट धरून हसायला येते. M-indicator

प्रकरण काय आहे?

M-Indicator मध्ये प्रवाशांसाठी एक चॅटचा ऑप्शन दिला आहे. मुळात हा ऑप्शन यासाठी दिला होता की एखाद्या ट्रेनला उशीर झाला तर, गर्दी आहे का, किंवा काही माहिती असेल तर प्रवाशांनी एकमेकांना सांगावे. पण आपले मुंबईकर जगात भारी आहेत. यांनी या ऑप्शनचा वापर माहितीसाठी नाहीतर, टाइमपासच्या गप्पा मारण्यासाठी करत आहेत.

हा व्हिडिओ princyparriikh नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर झाला आहे. त्यात RJ Princy Parikh ही तिथले चॅट वाचून दाखवत आहे आणि ते खरच इतके भारी आहेत की ऐकून तुम्हाला कॉमेडी शो बघतोय की काय असे वाटेल.

काय आहेत त्या गप्पा?

एकाने चॅटमध्ये लिहिले होते की CSMT ते टिटवाळा प्रवास करताना त्याचा मोबाईल हरवला आहे. तर त्यावर एकाने लगेच कमेंट केली, “फोनमधली सर्च हिस्ट्री डिलीट केली होतीस का रे?” तर दुसरा म्हणतो, “पुढचं स्टेशन पोलीस स्टेशन आहे.”दुसऱ्या एका चॅटमध्ये अर्जुन नावाच्या मुलाने विचारले, “जोगेश्वरीतला सुदर्शन बार चालू आहे का?” तर त्यावर एकाने उत्तर दिले, “हो चालू आहे, तिथला बांगडा मसाला एकदा खाऊन बघ.”

आणखी एकाने विचारले, “ट्रेनमध्ये बसायला जागा आहे का?” तर उत्तर आले, “अरे इथे मुंगीला पण पाय ठेवायला जागा नाही, बसायचे सोडून दे.” ऋतूजा नावाच्या एका मुलीने विचारले, “कल्याण AC ट्रेन कुठे पोहोचली?” तर तिला कुणीतरी रिप्लाय दिला, “कोणी फ्रँकी खायला येणार आहे का?”

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’

ट्रेनला उशीर झाला की प्रवाशांचा राग या चॅटवर निघतो.एकाने विचारले ट्रेन कुठे आहे? तर एकजण म्हणाला, “ट्रेन उशिरा आली तरी चालेल, पण लग्नाला उशीर व्हायला नको.”

लोकांना काय वाटते?

हा व्हिडिओ आतापर्यंत 30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. लोकांना हे चॅट खूपच आवडत आहेत. खर तर हा चॅटचा पर्याय चांगल्या कामासाठी दिला होता, पण मुंबईकरांनी त्याला एक छोटा फेसबुकच बनवून टाकले आहे. कोणी कोणाची मजा घेतोय, कोणी तक्रार करतोय, कोणी खरच मदत करतोय तर कोणी आपल्या दुकानाची जाहिरात पण तिथे करतोय.

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

थोडक्यात सांगायचे तर M-Indicator चा हा चॅट म्हणजे टाइमपासचा फुल धमाल अड्डा झाला आहे. एकदा वाचायला लागले की तुमचे स्टेशन कधी आले हे पण तुम्हाला कळणार नाही इतके ते भारी आहे. तुम्ही पण कधी M-Indicator वर असे मेसेज केले आहेत का? किंवा असे काही मजेशीर चॅट वाचले आहे का? असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Web Title: M indicator viral chat funny mumbai local train messages rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Local Trains
  • Marathi News
  • viral video

संबंधित बातम्या

Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज
2

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज

Dhule News: “मागण्या मान्य होईपर्यंत तलावातून बाहेर पडणार नाही!” धुळ्यात शेकडो आदिवासींचे जलसमाधी आंदोलन
3

Dhule News: “मागण्या मान्य होईपर्यंत तलावातून बाहेर पडणार नाही!” धुळ्यात शेकडो आदिवासींचे जलसमाधी आंदोलन

Sindhudurg News: देवगडमध्ये ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध! मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती
4

Sindhudurg News: देवगडमध्ये ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध! मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.