Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : भाजप नेत्यांची हायव्होल्टेज दंगल ; डीजेवरून रंगला कलगीतुरा

Nagpur News : शहरातील डीजे व साऊंड सिस्टिमवरील सरसकट बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या मागणीसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची भेट घेतली. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेनंतर डीजे वापराबाबत सकारात्मक तोडगा काढल्याचा दावा पक्षाने केला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 05, 2026 | 02:43 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सर्वसमावेशक विचार करा
  • न्यायालयात दाद मागणार
  • महापालिका आणि पोलीस आयुक्तांना निवेदन
Nagpur News :

नागरिकांना सर्वाधिक त्रासदायक ठरणाऱ्या तसेच मोठ्या प्रमाणात व्हायब्रेशन आणि ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्या बेस साऊंडवर निर्बंध कायम ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, टॉप आणि मिडल साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी राहणार नाही, असे आश्वासन नागपूर पोलिस आयुक्तांनी दिल्याचे भाजपने म्हटले आहे. या निर्णयामुळे डीजे व साऊंड सिस्टिमच्या व्यवसायावर अवलंबून असलेले व्यावसायिक, कामगार आणि कुटुंबीयांच्या रोजगारावरही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला.

साऊंड सिस्टिमच्या वापराबाबत निश्चित करण्यात येणारे नियम केवळ विशिष्ट उत्सवांसाठी मर्यादित न ठेवता वर्षभर, म्हणजेच ३६५ दिवस सर्वांसाठी समान पद्धतीने लागू राहतील, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले. त्यामुळे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी समान निकष लागू होतील.

Nagpur News : नागपुरात DJ बंदीचा आदेश धाब्यावर; दहीहंडीत DJचा दणदणाट, भरचौकात पोलिसांसमोरच…

सर्वसमावेशक विचार करा

शहरातील नागरिकांच्या भावना, कायदा व सुव्यवस्था, पर्यावरण संरक्षण तसेच डीजे व साऊंड सिस्टिम व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या रोजगाराचा विचार करून निर्णय घेण्याची मागणी दयाशंकर तिवारी यांनी केली. शिष्टमंडळात आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, सरचिटणीस श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, संदीप जाधव, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, नगरसेविका लक्ष्मी यादव, दिलीप दिवे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी होते.

न्यायालयात दाद मागणार

शहरात ४५०० डीजे व साऊंड सिस्टिम संचालक आहेत. प्रत्येकाकडे किमान ७ ते ८ जण काम करतात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. ऐन उत्सवात बंदी लावणे योग्य नाही, असे विदर्भ बैंक स्टेज असोसिएशनचे बंडू पदम यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पोलिसांकडे आवाज मोजण्याचे यंत्र असले तरी प्रशिक्षित तज्ज्ञ नाहीत, असे असोसिएशनचे उपाध्यक्ष नंदन गजेंद्रगडकर यांनी सांगितले.

डीजेवर बंदीची कारवाई केली जात असेल तर नियमानुसार ढोल, ताशा वादकांवरही कारवाई व्हावी, बंदी हटवली नाही तर न्यायालयात दाद मागणार, असे गजेंद्रगडकर म्हणाले, आवाजाबाबत नियम पाळण्याची तयारी असून याबाबत पोलिस आयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचे बंडू पदम म्हणाले, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत बॅकस्टेज, साऊंड व्यावसायिक, लाईट डेकोरेटर्स, जनरेटर पुरवठादार, वाहन चालक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या वार्षिक उत्पन्नाचा ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असतो. परंतु, या निर्णयामुळे या लहान व्यावसायिकांवर दिवाळखोरीची वेळ येईल. असोसिएशनने असेही म्हटले आहे की, हा आदेश संविधानाअंतर्गत व्यापाराच्या स्वातंत्र्याचेही उल्लंघन आहे.

Nagpur Crime : शेतकऱ्याच्या नावावर ७४ कोटींचा कर्जघोटाळा; आंतरराज्यीय टोळीचा आरोपी अटकेत

महापालिका आणि पोलीस आयुक्तांना निवेदन

शहरात लागू केलेली डीजे बंदी केवळ दोन महिन्यांपुरती सीमित न ठेवता कायमचीच लागू करा, अशी ठाम मागणी माजी आमदार संदीप जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर तसेच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे निवदन देऊन केली. ‘डीने मुक्त नागपूर’साठी आता व्यापक जनचळवळ उभारण्यात येत असल्याचे संदीप जोशी यांनी स्पष्ट केले.

मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले, ‘नॉईज फ्री नागपूर’ या मोबाईल अॅपवर येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई केली जाईल. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले की, कायद्यानुसार पोलिस प्रशासनाला एकावेळी ६० दिवसांपर्यंतच बंदीचा आदेश जारी करता येतो, जो पुढे वाढवता येऊ शकतो. ही बंदी कायमस्वरूपी टिकून राहावी यासाठी पोलिस दल सकारात्मक प्रयत्न करेल. सोबतच सामान्य ‘साउंड सिस्टम’ आणि ‘डीजे’ यातील तांत्रिक फरक नागरिकांनी समजून घेणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.
निवेदन देताना आयएमए महाराष्ट्राच्या अध्यक्ष

डॉ. मंजूषा गिरी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सचिन गाठे, विदर्भ टॅक्स पेअर्स असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू, डॉ. अजय देशपांडे, डॉ. गोपाल अरोरा, सीएजी नागपूरचे विवेक रानडे, सिनिअर सिटीझन कौन्सिलचे सचिव सुरेश रेवतकर, क्रीडा प्रतिनिधी अश्फाक शेख, परवेज, सदर छोटा मशिदचे मौलाना शरिक कुरेशी, भंते प्रज्ञानंदजी महाथेरो, फादर जोसेफ आणि गजानन निशितकर आदी होते.

Web Title: Nagpur news high voltage clash between bjp leaders heated exchange over dj music

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • BJp leader
  • Maharashtra Political Crisis
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : नागपुरात DJ बंदीचा आदेश धाब्यावर; दहीहंडीत DJचा दणदणाट, भरचौकात पोलिसांसमोरच…
1

Nagpur News : नागपुरात DJ बंदीचा आदेश धाब्यावर; दहीहंडीत DJचा दणदणाट, भरचौकात पोलिसांसमोरच…

Nagpur Crime : शेतकऱ्याच्या नावावर ७४ कोटींचा कर्जघोटाळा; आंतरराज्यीय टोळीचा आरोपी अटकेत
2

Nagpur Crime : शेतकऱ्याच्या नावावर ७४ कोटींचा कर्जघोटाळा; आंतरराज्यीय टोळीचा आरोपी अटकेत

Nagpur News : नागपुरात डीजे बंदीचा कडकडाट; आदेशावरून वातावरण तापले
3

Nagpur News : नागपुरात डीजे बंदीचा कडकडाट; आदेशावरून वातावरण तापले

Nagpur Suicide Case : मृत्यूच्या दारातून परतला तरुण; ११२ वर कॉल येताच पोलिसांची धाव
4

Nagpur Suicide Case : मृत्यूच्या दारातून परतला तरुण; ११२ वर कॉल येताच पोलिसांची धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.