फोटो सौजन्य AI
आरोपीची ओळख सचिन खुशाल कारेमोरे (४०, रा. नेरी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा) अशी पटली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश कामाले आणि पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना सांगण्यात यायचे की पिकांच्या नुकसानीची सरकारी भरपाई म्हणून दरवर्षी १० हजार रुपये मिळतील आणि त्यासाठी एसबीआयमध्ये खाते उघडणे आवश्यक आहे. या बहाण्याने शेतकऱ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ७/१२ उतारे घेतले जायचे.
आरोप आहे की त्यांच्या नावावर लाखोंचे कृषी कर्ज उचलले जायचे. पोलिस तपासात समोर आले आहे की एसबीआयच्या मौदा शाखेतून ५४ कोटी ६९ लाख ४२ हजार ८५० रुपये तसेच रामटेक शाखेतून १९ कोटी १३ लाख ५० हजारांचे कृषी कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर उचलले गेले. अशाप्रकारे दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांचे कर्ज काढले.
Nagpur News : नागपुरात डीजे बंदीचा कडकडाट; आदेशावरून वातावरण तापले
पोलिसांच्या माहितीनुसार, टोळीने कथितरीत्या बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम या कंपन्यांमध्ये वळवून काढून घेतली. मौदा आणि रामटेक पोलिस ठाण्यांमध्ये आतापर्यंत या प्रकरणात एकूण १६ आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
प्रकरणाचे धागेधीरे आंतरराज्यीय स्तरापर्यंत जोडलेले असल्याची माहिती समोर आली आहे. टोळीचे सदस्य केंद्रीय प्राधिकरणाकडून वैअरहाऊसिंग डेव्हलपमेंट अॅड रेग्युलेटरी अथॉरिटी, दिल्ली वेचून कथितरीत्या बनावट वेअरहाऊस लायसन्स मिळवायचे. एसबीआयमध्ये बनावट इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वैअरहाऊस पावती गहाण ठेवून ‘प्रोड्यूस मार्केटिंग लोन’ योजनेतर्गत शेतक-यांच्या नावावर करोड़ों रुपयांचे कर्ज उचलले जायचे.
पोलीस तपासात बहुतांश आरोपी वेगवेगळ्या राज्यांतील असल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेला आरोपी सचिन कारेमोरे याच्याविरुद्ध यापूर्वी भंडारा, गडचिरोली आणि अहेरी येथे धान घोटाळ्याशी संबंधित गुन्हेही दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. तो गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या तावडीतून बाहेर होता. नुकताच नागपूर उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.






