Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :’गड’ परत आणण्याचे कोहळेंसमोर आव्हान

Nagpur News : नागपुरातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कोहळेंसमोर आपला ‘गड’ पुन्हा मजबूत करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आगामी राजकीय घडामोडींमध्ये संघटन, मतदारांचा विश्वास आणि स्थानिक समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 05, 2026 | 02:46 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्र्याची भेट
  • अनिल सोले अजूनही तयार
  • आज भरणार अर्ज
Nagpur News:विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आठवभरापासून उमेदवार कोण राहील, याची उत्सुकता रविवारी अखेर संपुष्टात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कोहळे यांची मतदार नोंदणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली. यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोहळेच उमेदवार राहतील, असे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनीदेखील तसेच संकेत दिले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मध्यंतरी कोहळे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मकता दर्शवली. मात्र, दोन महिन्यांपासून माजी आमदार अनिल सोले यांचे नाव चर्चेत आले.

तेव्हापासून त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. गेल्या रविवारी फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक झाली. पण, त्यातून नाव समोर आले नाही. कोहळे, सोले, मतदार नोंदणी सहप्रमुख सुधीर दिवे, गिरीश देशमुख यांच्या नावांचीही चर्चा चालली.व्यवसायाने शिक्षक असलेले सुधाकर कोहळे यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिला.

या काळात ते नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्तदेखील होते. २०१४ साली त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली. २०१९ साली त्यांचा पत्ता साफ व करून मोहन मते यांना उमेदवारी दिली. विधानसभा निवडणुकीत त्यांना पश्चिम नागपूरमधून उतरवले. मात्र, त्यांना यशस्वी होता आले नाही.

Nagpur News : सीताबर्डीत नासुप्रच्या व्यापार संकुलाचे झाले खंडर

मुख्यमंत्र्याची भेट

सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सायंकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यात अर्ज भरण्यापासून निवडणुकीच्या व्युहरचनेवर चर्चा झाली.

अनिल सोले अजूनही तयार

प्रा. अनिल सोले यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता, कोहळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही सोले अर्ज भरण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते. दुसरीकडे भाजपची उमेदवारी मागणारे लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष अॅड. रमण सेनाड हे सोमवारी अर्ज भरणार आहे.

Nagpur News : मेट्रो सिटीकडे वाटचाल ,ट्राफिक मात्र जुन्याच वाटेवर

आज भरणार अर्ज

पदवीधर मतदारसंघात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात बेट लढत होण्याची शक्यता आहे.
दोन्ही उमेदवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.२३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

Web Title: Nagpur news kohale faces the challenge of reclaiming the fortcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • BJP
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल
1

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप
2

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन
3

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
4

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.