Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?

Nagpur News : नागपूरच्या फुटबॉलला मोठी परंपरा लाभली असली तरी सध्या स्थानिक पातळीवरील सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धांच्या संधी आणि खेळाडूंना मिळणाऱ्या व्यासपीठाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नवोदित खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि उत्साह असूनही त्यांना योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण संधी मिळणे गरजेचे आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 25, 2026 | 04:02 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • पंजाबच्या मिनर्वाने काय बदलले
  • खेळाडू घडतात कि केवळ संघ तयार होतात
  • माजी खेळाडूंच्या नजरेतून समस्या
Nagpur News : संध्याकाळ होताच उपराजधानीतील अनेक मैदानांवर एकच दृश्य पाहायला मिळते. हातात फुटबॉल घेऊन धावणारी मुले, घाम गाळणारे युवा खेळाडू आणि मैदानाच्या कडेला उभे राहून मुलांची स्वप्ने पाहणारे पालक. नागपूर-कामठीमध्ये फुटबॉल नवा खेळ नाही. या खेळाची मोठी परंपरा, क्लब संस्कृती, खेळाडू आणि उत्साहही आहे. मात्र या मैदानांवरून देशाच्या सर्वोच्च फुटबॉल व्यवस्थेपर्यंत किती खेळाडू पोहोचले, हा प्रश्न विचारला की चित्र अचानक बदलते. याच प्रश्नातून नागपूरच्या फुटबॉल व्यवस्थेची ही पाहणी सुरू झाली.

‘नवभारत’ च्या पाहणीत शहरात सुमारे ८० हून अधिक क्लब नोंदणीकृत असल्याचे समोर आले. हजारो खेळाडू विविध स्तरांवर प्रशिक्षण घेत आहेत. जिल्हास्तरावर नागपूरच्या संघाने मागील अनेक वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. आंतरजिल्हा स्पर्धांमध्येही नागपूर आघाडीच्या संघांमध्ये राहिले आहे. असे असतानाही राष्ट्रीय संघ, आयएसएल आणि मोठ्या व्यावसायिक क्लबपर्यंत पोहोचणाऱ्या खेळाडूंची संख्या अत्यंत मर्यादित आहे. या प्रवासातील सर्वात मोठी अडचण प्रतिभेची नसून, सामान्य खेळाडूला मैदानापासून राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचविणाऱ्या मार्गाची आहे.

Nagpur News : जीवाची भीती ,रस्त्यांवर काढली रात्र ;जलशुद्धीकरणात क्लोरीन वायू गळती

पंजाबच्या मिनर्वाने काय बदलले

भारतीय फुटबॉलमध्ये पंजाबची मिनेर्वा अकादमी एक उदाहरण म्हणून समोर येते. या अकादमीने केवळ स्पर्धा जिंकण्यावर भर न देता खेळाडू घडविण्याची संपूर्ण प्रक्रिया विकसित केली, कमी वयात प्रतिभा ओळखणे, निवासी प्रशिक्षण, शिक्षणासोबत खेळ, फिटनेस, पोषण, व्हिडिओ विश्लेषण आणि सातत्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव-या संपूर्ण मॉडेलमुळे खेळाडूंना दीर्घ प्रवासासाठी तयार केले जाते.

नागपूर आणि अशा यशस्वी मॉडेलमधील सर्वात मोठा फरक याच ठिकाणी दिसून येतो. नागपुरात अनेक खासगी अकादमी आपापल्या पातळीवर चांगले काम करत आहेत. मात्र शहरस्तरावर १०-१२ वर्षांच्या वयापासून खेळाडूची ओळख करून पुढील ८-१० वर्षांचे नियोजन करून त्याला घडविणारी सामायिक व्यवस्था अद्याप दिसत नाही.

खेळाडू घडतात कि केवळ संघ तयार होतात

फुटबॉल तज्ज्ञांच्या मते, एखाद्या शहराचे यश तेथे किती स्पर्धा होतात यावर ठरत नाही, तर तेथून किती खेळाडू उच्च स्तरावर पोहोचतात यावर ठरते, नागपुरात स्पधांची कमतरता नाही. शालेय स्पर्धा, जिल्हास्तरीय स्पर्धा आणि क्लब सामने नियमित होतात. मात्र स्पर्धेनंतर खेळाडूची पुढची पायरी काय, हा प्रश्न कायम आहे.

खेळाडूच्या कामगिरीचा डेटा तयार केला जातो का? त्याच्या कमतरतांवर स्वतंत्रपणे काम केले जाते का? त्याला चांगल्या क्लब आणि राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचण्यापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था आहे का? याच ठिकाणी सर्वात मोठा फरक दिसून येतो.

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा

माजी खेळाडूंच्या नजरेतून समस्या

८८ माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मते, नागपुरात क्षमतेची कमतरता नाही. येथून अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहेत, मात्र सातत्याने खेळाडू घडविणारी व्यवस्था विकसित होऊ शकलेली नाही. फुटबॉलसाठी शहरात अनुभवाची कमतरता नाही. मात्र या अनुभवाचा उपयोग खेळाडू विकासाचे नियोजन करण्यासाठी किती केला जात आहे, हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे माजी खेळाडूचे मत आहे.

Web Title: Nagpur news nagpurs footballwhere is it headed what is the future of nagpur football

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Footbaal
  • Nagpur News
  • Sports News

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…
1

महाराष्ट्राच्या वाघिणीने रशियाचं मैदान मारलं! अन्वी हिंगेची ‘या’ खेळात ‘सुवर्ण’भरारी, पदकांची संख्या थेट…

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला
2

Nagpur News : हेल्मेट डोक्यावर, कानात इअरफोन! ‘म्युझिकल ड्रायव्हिंग’मुळे अपघातांचा धोका वाढला

कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…
3

कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज
4

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.