Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :सीताबर्डीत नासुप्रच्या व्यापार संकुलाचे झाले खंडर

Nagpur News : सीताबर्डीतील नासुप्रच्या व्यापार संकुलाची दुरवस्था झाली असून, देखभालीअभावी या संकुलाचे अक्षरशः खंडहरात रूपांतर झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाच्या जागेची अशी अवस्था झाल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 04, 2026 | 03:55 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • शौचालयाची अवस्थाही दयनीय
  • पावसात व्यवसायाची लागते वाट
  • बब्बू भाई,अध्यक्ष, सीताबर्डी व्यापार संकुल
Nagpur News:सीताबर्डी येथील नासुप्रचे व्यापार संकुल देखभालीअभावी खंडरात रूपांतरित झाले आहे. वर्षानुवर्षे या व्यावसायिक संकुलाची रंगरंगोटीही करण्यात आलेली नाही. स्थानिक दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, नागपूर सुधार प्रन्यास आजही वेळेवर या व्यावसायिक संकुलासाठी ग्राउंड टॅक्स वसूल करतो; मात्र येथे स्वच्छतेसाठीही प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.

संकुलाच्या पायऱ्यांपासून भिंतीपर्यंत सर्वकाही जीर्ण दिसू लागले आहे. संकुलातील दुकानांच्या छतांतून पावसाचे पाणी टपकते. दुकानदारांना छतावरच प्लास्टिक अथवा अन्य उपाय करून काम भागवावे लागत आहे. अशा परिस्थितीत दुकानदारांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे.

‘नवराष्ट्र’शी बोलताना दुकानदारांनी या व्यावसायिक संकुलाच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. दुकानदारांनी सांगितले की, या संकुलाचे बांधकाम वर्ष २००२ मध्ये झाले होते. यात सुमारे ११४ दुकाने आहेत. मागील १५ ते १७ वर्षांपासून इमारतीची देखभाल आणि रंगरंगोटी झालेली नाही. त्यामुळे तिची स्थितीही सातत्याने जीर्ण होत आहे.

बाहेरपासून आतपर्यंत इमारत झाली बेरंग नासुप्रच्या या व्यावसायिक संकुलाची पाहणी केल्यानंतर परिस्थिती धक्कादायक दिसून आली. बाहेरील परिसरापासून आतपर्यंत सर्वत्र इमारत बेरंग दिसली. भिंती वर्षानुवर्षे साफही करण्यात आलेल्या नसाव्यात, असे चित्र दिसून आले. ठिकठिकाणी धूळ आणि स्वच्छतेचा अभाव दिसून आला. अनेक ठिकाणी छत खराब झाल्याचे दिसले. पायऱ्यांचीही अशीच अवस्था पाहायला मिळाली.

Nagpur News : मेट्रो सिटीकडे वाटचाल ,ट्राफिक मात्र जुन्याच वाटेवर

शौचालयाची अवस्थाही दयनीय

इमारतीत पुरुष आणि महिलांसाठी शौचालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे .मात्र देखभालीअभावी त्याची अवस्थाही दयनीय झाली आहे.विशेषतःमहिलांच्या शौचालयाची स्थिती अत्यंत खराब दिसून आली. महिलांच्या शौचालयाला नेहमीच कुलूप लावलेले असते. महिला शौचालयाच्या दरवाजाचा खालचा भागही तुटलेला आहे. त्यामुळे महिलांनाही येथे जाण्यास अस्वस्थ वाटत असावे.

पावसात व्यवसायाची लागते वाट

पावसाळ्याच्या दिवसांत व्यवसायाचाही वाट लागते.दुकानाच्या छतामधून पाणी टपकते. त्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. छतावर प्लास्टिक लावून काम भागवावे लागत आहे. संकुलाच्या छतावरूनही पावसाचे पाणी खाली पडते. अनेक दुकानामध्ये पाणी साचते. सुमारे १५ वर्षांपासून इमारतीची रंगरंगोटीही करण्यात आलेली नाही. दुकानदार नासुप्रला नियमितपणे ग्राउंड टॅक्स देतात.

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

बब्बू भाई,अध्यक्ष, सीताबर्डी व्यापार संकुल

८ संकुलातील दुकाने ३० वर्षाच्या लीजवर देण्यात आली आहेत आणि दुकानदार नासुप्रला ग्राउंड टॅक्सचा भरणा करतात. दुकानदार असोसिएशनकडून आपल्या पातळीवरच स्वच्छता आणि मूलभूत व्यवस्थांची काळजी घेतली जात आहे, तर इमारतीच्या मुख्य ढाच्याच्या देखभालीची जबाबदारी नासुप्रची आहे.

असोसिएशनने नासुप्रला अर्ज देऊन या जुन्या इमारतीला पाडून नवीन कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी केली आहे; मात्र अनेक अर्ज देऊनही आतापर्यंत या दिशेने कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. लवकरात लवकर याच्या नूतनीकरणाची आणि पुनर्बाधणीची प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे.

Web Title: Nagpur news nits commercial complex in sitabuldi has turned into a ruincp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Mall
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News :मेट्रो सिटीकडे वाटचाल ,ट्राफिक मात्र जुन्याच वाटेवर
1

Nagpur News :मेट्रो सिटीकडे वाटचाल ,ट्राफिक मात्र जुन्याच वाटेवर

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू
2

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
3

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

Nagpur News :अन्यथा ओबीसींचे चलो दिल्ली ;२५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मोर्चे
4

Nagpur News :अन्यथा ओबीसींचे चलो दिल्ली ;२५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मोर्चे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.