फोटो सौजन्य सोशल मीडिया
Nagpur News : ‘नागपूर तो झांकी है, आझाद मैदान बाकी है’ ; कंत्राटदार उतरले रस्त्यावर
यात वर्ग ‘अ’मध्ये ४० पदे, गट ‘ब’मध्ये ५७ पदे आणि वर्ग ‘क’मध्ये ६३ पदे मंजूर केली आहेत. एनएमआरडीएची प्रमुख कामे लक्षात घेता अभियांत्रिकी विभागासाठी सर्वाधिक ६१ पदे मंजूर केली तर विकास परवानगी व नियोजन विभागासाठी ३८ पदे ठेवली आहेत. याशिवाय महसूल आणि जमीन व्यवस्थापन मजबूत करण्यासाठीही महत्त्वाची पदे मंजूर केली आहेत.
त्याव्यतिरिक्त प्रशासन व मनुष्यबळासाठी १२, जमीन व मालमत्ता विभागासाठी ११, अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकासाठी
९, लेखा व वित्त विभागासाठी ९, अग्निशमन विभागासाठी ७, विधी विभागासाठी ३ आणि जनसंपर्क विभागासाठी २ पदे मंजूर केली आहेत.
राजपत्रित आणि प्रशासकीय स्तरावरील आयएएस, उपजिल्हाधिकारी, नगररचना अधिकारी या वरिष्ठ पदांवर राज्य सरकारच्या मूळ विभागातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली जाणार आहे. लिपीक, टंकलेखक आणि सहायक अभियंतासारखी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून थेट भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत.
शासन निर्णयात स्पष्ट केले की, विविध विभागांमध्ये पदांचे हे विभाजन प्रशासकीय सोयीसाठी आहे. महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम २०१६च्या कलम १२(३) अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कामाचे वाटप आणि अंतर्गत बदल्यांचे अंतिम अधिकार प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तांकडेच राहतील.
Nagpur : महिंद्रा सुसाट, जेएसडब्ल्यू ‘ भटकला ‘ ; महिंद्राला मिळणार ८०० एकर जमीन !
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचे एक पदही मंजूर झाले असून , नव्या प्रशासकीय आकृतिबंधात
महसूल विभागासाठी सरकारने १ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याव्यतिरिक्त २ उपजिल्हाधिकारी आणि २ तहसीलदारांची पदेही मंजूर केली आहेत.



