Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : ‘उद्या भेटू’… पण तो उद्या आलाच नाही ;एपीआय ज्ञानेश्वर झोल यांच्या आत्महत्येने पोलिस दलात हळहळ

Nagpur News : नागपूर पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे. एपीआय ज्ञानेश्वर झोल यांच्या आत्महत्येच्या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे पोलिसांच्या मानसिक ताणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 17, 2026 | 03:05 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • कुटुंबासोबत घालवले काही शेवटचे क्षण
  • कारणांचा शोध सुरू
  • सहकाऱ्यांचा आधारवड हरपला
Nagpur News : सहाय्य्क पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर झोल (३५) यांच्यासाठी शनिवारी सहकाऱ्यांना निरोप देताना उच्चारलेले ‘उद्या निवांत भेटू’ हे शब्द अखेरचे ठरले. त्यानंतरचे काही तास त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांचे साक्षीदार ठरले. त्यांच्या निधनाने नागपूर पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मूळचे जालना जिल्ह्यातील असलेले ज्ञानेश्वर झोल नागपूर पोलिस आयुक्तालयातील अर्ज शाखेत कार्यरत होते. ते पीसीएमटी पोलिस वसाहतीतील शासकीय निवासस्थानी पत्नी आणि साडेतीन वर्षांची जुळी मुले-एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यासोबत राहात होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी सकाळी पोलिस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात झोल सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी सहकारी अधिकारी आणि मित्रांसोबत काही वेळ निवांत गप्पा मारल्या. उपनिरीक्षक अंकुश राठोड यांच्यासह अनेक सहकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आरोग्याची काळजी घ्या, अनावश्यक ताण टाळा,असा सल्लाही त्यांनी सहकाऱ्यांना दिला. गप्पा आटोपल्यानंतर ‘उद्या निवांत भेटू’ असे म्हणत ते घरी परतले. मात्र, त्यांच्या आयुष्यात तो ‘उद्या’ कधीच उजाडला नाही. रविवारी मध्यरात्री त्यांच्या निधनाची बातमी पोलिस सहकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.

Nagpur News : वैदर्भीवादी मुंबईत देणार धडक ;१८ व १९ ला आझाद मैदानात करणार आंदोलन !

कुटुंबासोबत घालवले काही शेवटचे क्षण

शनिवारी कार्यालयातील कार्यक्रमानंतर झोल यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला. पत्नी आणि मुलांना बाहेर फिरायला घेऊन गेल्यानंतर ते सायंकाळी घरी परतले होते. त्यानंतर घरात काही कारणावरून बाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रात्री उशिरा त्यांनी गळफास घेतल्याचे सांगितले जाते. पत्नीच्या लक्षात येताच आरडाओरड झाली. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तत्काळ मेयो रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव मूळ गावी जालना येथे रवाना केले.

कारणांचा शोध सुरू

सेवेत असलेल्या अधिकाऱ्याच्या अशा आकस्मिक निधनामुळे पोलिस दलात विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांच्या मृत्यूमागे कौटुंबिक, वैयक्तिक अथवा अन्य कोणते कारण होते का, याचा पोलिस तपास करीत आहे. घटनेपूर्वी ते कोणाच्या संपर्कात होते.

त्यांच्या मानसिक स्थितीबाबत काही संकेत मिळतात का यासह विविध बाबींची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुरावे संकलित केले आहेत. आत्महत्येची कारणे आणि घटनेची नेमकी पार्श्वभूमी तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

सहकाऱ्यांचा आधारवड हरपला

ज्ञानेश्वर झोल यांच्या निधनाची बातमी समजताच नागपूर पोलिस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. कर्तव्याप्रती निष्ठावान, सहका-यांशी मनमोकळेपणाने वागणारे आणि प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. काही तासांपूर्वीच ज्यांच्यासोबत हसत-खेळत गप्पा मारल्या, त्यांचाच निरोप घ्यावा लागल्याने अनेक सहकारी भावूक झाले.

पोलिस आयुक्तालयातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यांच्या पश्चात पत्नी, जुळी मुले आणि कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने एका कुटुंबाचा आधारच नव्हे, तर पोलिस दलातील एका जिवलग सहका-याचीही कायमची उणीव निर्माण झाली आहे.

Web Title: Nagpur news see you tomorrow but that tomorrow never came suicide of api dnyaneshwar zole leaves the police force saddened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Nagpur News
  • Nagpur Police Department
  • Sucide News

संबंधित बातम्या

Nagpur News :सीताबर्डीत नासुप्रच्या व्यापार संकुलाचे झाले खंडर
1

Nagpur News :सीताबर्डीत नासुप्रच्या व्यापार संकुलाचे झाले खंडर

Nagpur News :मेट्रो सिटीकडे वाटचाल ,ट्राफिक मात्र जुन्याच वाटेवर
2

Nagpur News :मेट्रो सिटीकडे वाटचाल ,ट्राफिक मात्र जुन्याच वाटेवर

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू
3

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
4

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.