फोटो सौजन्य AI
Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !
संतोष हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. जखमी भालचंद्र यादव (४४, रा. लाकडीपूल) हे मूळचे मध्य प्रदेशातील आहे. रोजगाराच्या शोधात नागपुरात स्थायिक झाले. आरोपी आणि यादव एकाच परिसरात राहत असल्याने त्यांची तोंडओळख होती. घटनेच्या रात्री यादव यांनी पावभाजीचा ठेला घरी आणला. ते ठेल्याला कुलूप लावत असताना संतोष आला. त्याने यादव यांच्याकडे पावभाजीची मागणी केली. मात्र, पावभाजी संपल्याचे यादव यांनी सांगितले. त्यावर संतोष संतापला. संतोषने यादव यांची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कटर काढून गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यादव यांनी प्रसंगावधान राखत वार चुकविण्यासाठी प्रतिकार केला. त्यामुळे कटरचा वार त्यांच्या डाव्या गालावर लागला. यात यादव गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले.
Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी
यादव यांच्यावर उपचार सुरू घटनेनंतर परिसरातील
नागरिकांनी यादव यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार केले. यादव यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी संतोष रनसूरे याच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ आणि मारहाणीच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहिती वरून आरोपी फरार झाला आहे आणि नागपूर पोलीस त्याच्या मागावर असल्याचे बोलले जात आहे .

