Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smriti Mandhana: स्मृती मंधानाजवळ इतिहास रचण्याची संधी, विराट-रोहितलाही टाकणार मागे

Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाची नियमित कर्णधार स्मृती मंधाना टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. विराट-रोहितलाही हा कारनामा जमला नाही

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 16, 2026 | 10:25 AM
स्मृती मंधाना रचणार मोठा इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

स्मृती मंधाना रचणार मोठा इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • स्मृती मंधाना रचणार मोठा इतिहास 
  • केवळ १३३ धावांची गरज 
  • विराट – रोहितलाही टाकणार रेकॉर्डमध्ये मागे 
Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाची नवीन कर्णधार स्मृती मंधाना, पहिल्यांदाच नियमित कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेकडे चाहत्यांचे लक्ष आहे आणि भारत ही मालिका जिंकले अशी अपेक्षाही आहे. 

या मालिकेत स्मृतीला एक असा ऐतिहासिक विक्रम करण्याची संधी आहे, जो पुरुष किंवा महिला क्रिकेटमधील कोणत्याही खेळाडूने आजपर्यंत केलेला नाही. स्मृती मंधाना कमाल खेळाडू आहे, तिचा खेळण्याचा फॉर्मही सध्या उत्कृष्ट असून ती या रेकॉर्डला याच सामन्यामध्ये गवसणी घालेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. 

स्मृती मंधानाचा रेकॉर्ड 

स्मृती मंधानाने टी-२० आंतरराष्ट्रीय धावांच्या बाबतीत पुरुष खेळाडूंना मागे टाकले आहे. बाबर आझम, जोस बटलर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पुरुष क्रिकेटपटूंच्या धावा स्मृतीपेक्षा कमी आहेत. आता ती टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५,००० धावा पूर्ण करणारी जगातील पहिली खेळाडू बनण्याच्या अगदी जवळ आहे.

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व

स्मृती मंधाना १३३ धावा करून इतिहास रचू शकते

आजपर्यंत पुरुष किंवा महिला क्रिकेटमधील कोणत्याही खेळाडूला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५,००० धावा करता आलेल्या नाहीत. पण भारतीय कर्णधार स्मृती मंधाना हा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. तिने १७९ सामन्यांमधील १७२ डावांमध्ये दोन शतके आणि ३७ अर्धशतकांसह ४८६७ धावा केल्या आहेत. आता, हा ऐतिहासिक विश्वविक्रम करण्यासाठी तिला फक्त १३३ धावांची गरज आहे, जो ती झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी मालिकेत पूर्ण करू शकते.

भारत आणि झिम्बाब्वे प्रथमच द्विपक्षीय मालिका खेळणार

भारत आणि झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघांमधील तीन सामन्यांची टी-२० मालिका शुक्रवारी सुरू होत आहे. दोन्ही देशांच्या महिला संघांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका आहे. झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजवर एकदिवसीय सामन्यात जोरदार विजय मिळवला असून, त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि संघाचे नेतृत्व जोसेफिन न्कोमो करणार आहे. टी-२० मालिकेतील तिन्ही सामने १६, १८ आणि २० ऑक्टोबर रोजी रायपूरमध्ये खेळले जातील. यानंतर दोन्ही संघ वडोदरा येथे जातील, जिथे २३, २५ आणि २८ ऑक्टोबर रोजी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल.

Smriti Mandhana : “त्या परिस्थितीत मला देवांची आठवण…” लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधना पहिल्यांदा आली समोर…; पहा VIDEO

Web Title: Smriti mandhana ready to make record 5000 runs in t20 dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • cricket news
  • Smriti Mandhana
  • Sports News

संबंधित बातम्या

Table Tennis: टेनिस कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा! मुलींच्या गटात इशिता पाटीलने थेट…
1

Table Tennis: टेनिस कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा! मुलींच्या गटात इशिता पाटीलने थेट…

Cricket: कोंडाळा महालीच्या मुलींची बाजी, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड
2

Cricket: कोंडाळा महालीच्या मुलींची बाजी, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
3

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना
4

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.