Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News : नागपुरात DRIने अवघ्या तीन दिवसांत केलेल्या दोन धडक कारवायांमध्ये बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. तसेच अॅम्फेटामाइन तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटवरही कारवाई करण्यात आली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 02, 2026 | 03:59 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पुराडा गावाजवळ कातडी हस्तगत
  • यापूर्वीही वन्यजीव तस्करांवर कारवाई
  • राजधानी एक्सप्रेसमध्ये अमली पदार्थ
Nagpur News : सध्या राज्यात गुप्तपणे सुरु असलेल्या विविध वस्तूंच्या तस्करीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत . याच्या बातम्या अधून मधून प्रसारमाध्यमांवर दिसत असतात . पण वन्यजीवांच्या तस्कऱ्या काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत . पोलीस यंत्रणासुद्धा निकराचा प्रयत्न करून अशा टोळ्यांना पकडत आहेत .

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर क्षेत्रीय युनिटने गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या तीन दिवसांत दोन मोठ्या कारवाया केल्या. एका कारवाईत आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करीत १.०५ कोटीचे अॅम्फेटामाइन जप्त केले तर दुसऱ्या कारवाईत गोंदिया जिल्ह्यात बिबट्याची कातडी जप्त करून वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली.

पुराडा गावाजवळ कातडी हस्तगत

२९ सप्टेंबरला डीआरआयच्या पथकाने गोंदिया जिल्ह्यातील पुराडा गावाजवळ वन्यजीव तस्करीत सहभागी असलेल्या टोळीवर कारवाई करताना बिबट्याची कातडी हस्तगत केली. या प्रकरणात दोन जणांना अटक केली. जप्त कातडी आणि अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा

यापूर्वीही वन्यजीव तस्करांवर कारवाई

वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने डीआरआयकडून देशभरात सातत्याने कारवाया करण्यात येत आहेत, यापूर्वी उज्जैन येथे बिबट्याची कातडी सिवनी येथे वाघाची हाडे, पिलेरू आणि जगदलपूर येथे खवल्या मांजराचे खचले तब म्हैसूर येथे हतीचे दात जप्त करण्यात डीआरआयला यश आले आहे.

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

राजधानी एक्सप्रेसमध्ये अमली पदार्थ

राजधानी एक्सप्रेसमध्ये आढळले अमली पदार्थ: २७ सप्टेंबरला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी आरपीएफ, मध्य रेल्वेच्या मदतीने नागपूर रेल्वे स्थानकावर कारवाई केली. हजरत निजामुद्दीन-केएसआर बंगळुरू राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन सामानाची झडती घेतली. यावेळी सुटकेसच्या आतील कापडी अस्तराच्या मागे कार्डबोर्डचा गुप्त कप्पा तयार केल्याचे आढळले.

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

या कप्प्यात निळ्या कार्बन पेपरमध्ये गुंडाळलेली दोन पाकिटे सापडली. फील्ड ड्रग टेस्टिंग किटने तपासणी केली असता त्यात अॅम्फेटामाइन असल्याचे निष्पन्न झाले, अधिकाऱ्यांनी एकूण १.३१२ किलो अॅम्फेटामाइन जप्त केले. त्याची अवैध बाजारातील किंमत सुमारे १.०५ कोटी रुपये आहे. आरोपी महिलेला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करून त्याच दिवशी सुटीच्या न्यायालयात हजर केले.

Web Title: Nagpur news two dri raids in 3 days amphetamine racket busted along with leopard skin smuggling cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • navrashtra news
  • wildlife

संबंधित बातम्या

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत  ‘युवा निर्धार मेळावा’
1

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत ‘युवा निर्धार मेळावा’

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
2

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा
3

Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा

Chandrapur News: ₹29,800च्या बिलाने वाढवली खडसंगी ग्रामपंचायतीची डोकेदुखी; ‘सुपारी’च्या नोंदीवर सवाल
4

Chandrapur News: ₹29,800च्या बिलाने वाढवली खडसंगी ग्रामपंचायतीची डोकेदुखी; ‘सुपारी’च्या नोंदीवर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.