Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Rain :नागपूर पाण्याखाली ,मुख्यमंत्र्याच्या शहरात पाणी धुरंधर , बाकी पाण्याच्या अंदर

रस्ते, उड्डाणपुलाचे शहर एकाच मुसळधार पावसात कुरूप झाले. हा पाऊस २३ सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या पावसाची आठवण करून देत होता. मनपाच्या नालेसफाई, नदी सफाईचीही पोलखोल झाली. विकासकामांचे वाभाडे निघाले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 29, 2026 | 02:36 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मनपा, सरकारच्या नावाने मोडली बोटे
  • उड्डाणपूल,  अंडरब्रीज बनले जलतरणतलाव
▶ नागपूर, ब्युरो रिपोर्टर. मंगळवारी पावसाने अचानक रौद्ररूप धारण केले. दुपारनंतर ढगफुटीसदृश्य पाऊस बरसला. तासभर पावसाचा हैदोस सुरू होता. शहर जलमय झाले. वस्ती व रस्ते पाण्याने भरून गेले. प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सिमेंटचे रस्ते अक्षरक्षः तलाव झाले. अंडरब्रीज, उड्डाणपूलही ओव्हरफ्लो झाले. शाळांमध्ये पाणी घुसले. विद्यार्थ्यांना दोर बांधून बाहेर काढावे लागले. अनेक ठिकाणी झाडे पडली. अनेक भागांत पाणी घुसल्याने अग्निश्मन विभागाची मदत मागितली. दुपारी २.३० पर्यंत १०८.१ मिमी तर सायंकाळी ५.३० पर्यंत १७९ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने पुढील तीन दिवस पुन्हा अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारची सकाळ उजाडताच पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. सकाळी १० पासूनच सुरू झालेल्या पावसाने दुपारी १ वाजता जोर धरला. मुसळधार बरसण्यास सुरुवात केली. तासभर मनसोक्त बरसला. त्यामुळे शहर जलमय झाले. ढगफुटीसदृश्य पावसामुळे जवळची वाहनेही दिसत नव्हती. रस्ते, अंडरब्रिज, उड्डाणपूल सर्वच पाण्याने भरून गेले-सिमेंट रस्त्यांमुळे नागरिकांचा संताप पुन्हा उघड झाला. थाटामाटाने पाठीवर थाप मारून बांधलेल्या अंडरब्रीजमध्येही कंबरेएवढे पाणी साचले. उड्डाणपुलांवरही गुडघ्याएवढे पाणी भरले. नाल्यावरून पाणी वाहून वस्त्यांमध्ये शिरत होते. नाग, पिवळी व पोहरा नदी दुथडी भरून वाहत होती. पावसामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरत होते. मनपाच्या अग्निशमन विभागाला सायंकाळपर्यंत ४० वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्या.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज शाळा, कॉलेजला सुट्टी; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

मनपा, सरकारच्या नावाने मोडली बोटे
नागपूरकर तासाभराच्या पावसाने अक्षरक्षः वैतागली होती. सिमेंट रस्त्यामुळे नागरिकांची मोठी ओरड कायम आहे. पावसात तर सरकारची चांगलीच यावरून पोलखोल होते.
शिवाय, वर्षभर रस्त्यांमध्ये खोदकाम व विकासाच्या नावावर सुरू असलेल्या अनेक कामांमुळे नागरिक त्रस्त आहे. मनपा, सरकारच्या नावाने बोटे मोडली जात आहेत.
अनेक नागपूरकर पंप लावून घरात घुसलेले पाणी काढत होती. शिवाय, अनेक सोसायटी, अपार्टमेंट्स, व्यावसायिक संकुलातही गुडघाभर पाणी भरलेले आहेत.

Nagpur : विदर्भ साहित्य संघ आपली जागा परत करणार !

उड्डाणपूल, अंडरब्रीज बनले जलतरणतलाव
नरेंद्रनगर अंडरब्रीजमध्ये पाणी
नव्या यासाठी तंत्रज्ञान आधारित मोठी विहीर व पंपची व्यवस्था केली. पावसाच्या पाण्याचे काही मिनिटातच निचरा होईल, असा दावा होता. तो सपशेल खोटा ठरला, नरेंद्रनगर अंडरब्रीजमध्ये कंबरेपेक्षा जास्त पाणी साचले. वारसारखी मोठी वाहनही बुडाली. जुने मनीधनगर, सौमलवाडा-मनीषनगर, कॉटन मार्केट, लोहापूल, मिरची बाजार अंडरपास, भानखेडा अंडरपास आदी पाण्याने भरले होते. यावरून शहराच्या स्मार्ट लूक’ची पोलखोल झाली.

Web Title: Nagpur rain nagpur submerged in the chief ministers city water reigns supremeeverything else is underwater

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Nagpur Rain

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
2

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?
3

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?

सणासुदीच्या दिवसात बळीराजा संकटात, महायुतीचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही; काँग्रेसची टीका
4

सणासुदीच्या दिवसात बळीराजा संकटात, महायुतीचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही; काँग्रेसची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.