Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी

पुरंदरमधील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर उपसा योजनेचे पाणी शेतकऱ्यांना कोणतीही पाणीपट्टी अथवा वीजबिल न करता मोफत देण्यात यावे, अशी ठाम मागणी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2026 | 02:00 PM
शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पुरंदरच्या शेतकऱ्यांना उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची मागणी
  • विजय शिवतारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
  • जादा पाणीपट्टी वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी
सासवड : पुरंदरमधील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर उपसा योजनेचे पाणी शेतकऱ्यांना कोणतीही पाणीपट्टी अथवा वीजबिल न करता मोफत देण्यात यावे, अशी ठाम मागणी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी केली आहे. यासंदर्भात शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र पाठवून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

 

पुणे शहरातून वापरानंतर नदीपात्रात सोडले जाणारे साडेचार टीएमसी पाणी पुरंदर उपसा सिंचन योजने द्वारे पुरंदरच्या शेतकऱ्यांना दिले जाते. या पाण्यावरच परिसरातील शेतकरी भाजीपाला, फळे, फुलांचे उत्पादन घेतात तसेच पिकविलेला शेतमाल पुणे शहर व परिसरातील दैनंदिन गरजा भागविण्यासाठी महत्वाचा ठरतो. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी हि योजना पूर्ण पणे मोफत चालविणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने संबंधित खर्चाची तरतूद करून पाणी उपलब्ध करून दिल्यास दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे म्हंटले आहे.

दरम्यान आमदार विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची पुरंदर उपसा योजनेसह विविध विषयाबाबत महत्वपूर्ण बैठक घेतली आहे. यावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजीव चोपडे, जलसंपदा विभागाचे मुख्यअभियंता प्रवीण कोळे, कार्यकारी अभियंता अमरजित बिराजदार, उप कार्यकारी अभियंता ज्योती घुगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना न्याय पद्धतीने पाणी वाटप करण्याच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

शेतकऱ्यांकडून जादा पाणीपट्टी घेतलेल्या अधिकऱ्यांची चौकशी करावी

सध्याच्या टंचाई काळात शेतकरी पिके वाचविण्यासाठी पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी धडपड करीत आहे. या परिस्थितीत योजनेचे अधिकारी मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी जादा पैसे घेतले असतील त्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. अशी जोरदार मागणी पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी केली आहे.

पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी मागीलवर्षी प्रमाणेच पाणीपट्टी भरावी

पुरंदर उपसा योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आहे. यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांनी जादा पैसे भरण्याची गरज नाही. मागीलवर्षी १९ टक्के पाणीपट्टी होती. त्याप्रमाणे यंदाही त्याच दराने पाणीपट्टी भरावी. पाणीपट्टीचे पैसे भरताना रोख स्वरुपात जमा न करता तालुका पातळीवर तसेच पंप हाउस मध्ये क्युआर कोड लावले आहेत त्यावर ऑनलाईन पैसे जमा करावेत. असे आवाहन आमदार विजय शिवतारे यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांचा धडाका; रस्ते, पदपथ, नाले अन् रुग्णालयांच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी

डयाशबोर्ड वरून सर्व माहिती मिळणार

पुरंदर उपसाचे अनेक अधिकारी काही शेतकऱ्यांना पैसे भरूनही वेळेवर पाणी न देता ठराविक लोकांना त्यांच्या सोयीनुसार पाणी देतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र टंचाई काळात अधिकाऱ्यांनी कोणतेही राजकारण किंवा मनमानी न करता सर्वाना समान न्याय द्यावा. अशा सूचना विजय शिवतरे यांनी योजनेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पाणी वाटपात कोणताही दुजाभाव होऊ नये आणि पाणीवाटप पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी योजनेच्या कार्यालयात डयाशबोर्ड बसविण्याची व्यवस्था केली आहे. त्यावर कोणत्या शेतकऱ्याने कधी पैसे भरले, आज कोणत्या भागात पाणी सुटणार आहे, दुसऱ्या भागात काही पाणी सुटणार आहे, किती तास आणि किती पाणी मिळणार याची सर्व माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी वाटपातील गोंधळ कमी होऊन पारदर्शक पद्धतीने पाणी वाटप होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची मागणी कोणी केली आहे?

    Ans: पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पाणीपट्टी आणि वीजबिल न आकारता मोफत पाणी देण्याची मागणी केली आहे.

  • Que: पुरंदर उपसा योजनेचे पाणी शेतकऱ्यांना किती दराने मिळणार आहे?

    Ans: आमदार विजय शिवतारे यांनी मागील वर्षीप्रमाणेच यंदाही १९ टक्के पाणीपट्टीच्या दराने पैसे भरण्याचे आवाहन केले आहे. मोफत पाण्याबाबत शासनाकडे स्वतंत्र मागणी केली आहे.

  • Que: पुरंदर उपसा योजनेतील पाणीवाटप पारदर्शक करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे?

    Ans: पाणीवाटपातील गैरप्रकार टाळण्यासाठी योजनेच्या कार्यालयात डॅशबोर्ड बसविण्यात येणार आहे. यावर शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम, पाणी सोडण्याचे वेळापत्रक आणि पाणीपुरवठ्याची माहिती उपलब्ध होणार आहे.

Web Title: Purandar mla vijay shivtare has made a major demand to chief minister devendra fadnavis nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Purandar
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
1

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर
2

पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला
3

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

दौंडच्या हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा पेटणार; सुप्रिया सुळेंची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
4

दौंडच्या हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा पेटणार; सुप्रिया सुळेंची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.