Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची बहुप्रतीक्षित तसेच हिंजवडी आयटी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात मैलाचा दगड ठरणारी ‘पुणे मेट्रो लाईन-३’ (पुणेरी मेट्रो - पिंक लाईन) प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2026 | 01:39 PM
पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! 'या' तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर

पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! 'या' तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर

Follow Us
Follow Us:
  • पुणेकरांसाठी मेट्रोची प्रतीक्षा संपली
  • हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत
  • तिकीटदर किती असणार?
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची बहुप्रतीक्षित तसेच हिंजवडी आयटी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यात मैलाचा दगड ठरणारी ‘पुणे मेट्रो लाईन-३’ (पुणेरी मेट्रो – पिंक लाईन) प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.२०३ किलोमीटर लांबीच्या संपूर्णतः उन्नत मेट्रो मार्गिकेचे भव्य लोकार्पण येत्या ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या मार्गावरून ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून नियमित प्रवासी वाहतूक सुरू होईल, अशी घोषणा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’चे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी आणि मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण उपस्थित होते.

केंद्राच्या राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण २०१७ अंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर डीबीएफओटी पद्धतीने साकारण्यात आलेला हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे. टाटा आणि सीमेन्स यांच्या संयुक्त सहभागातून स्थापन पीआयटीसीएमआरएल कंपनीने सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्चून हा मार्ग उभारला आहे.

पहिल्या टप्प्यात १७ स्थानके खुली

या मार्गावर एकूण २३ स्थानके असून पहिल्या टप्प्यात १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जात आहेत. यातील माण, हिंजवडी फेज-२ सर्कल-१, पद्मभूषण चौक, कृषी महाविद्यालय आणि जिल्हा न्यायालय अशा सात स्थानकांवर सुरुवातीला एक जिना खुला राहील. उर्वरित १० स्थानकांवर दोन्ही जिने खुले असतील. स्थानक क्रमांक १३ व १४ चे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होईल, तर उर्वरित चार स्थानके जानेवारी २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होतील. या संपूर्ण मार्गाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.

तिकीट दरांची घोषणा; महामेट्रोपेक्षा दर अधिक!

पीएमआरडीएने पुणेरी मेट्रोसाठी सवलत करारानुसार अंतरावर आधारित अधिकृत भाडेदर निश्चित केले आहेत:

  • ० ते २ किमी : १२ रुपये
  • २ ते ४ किमी : २५ रुपये
  • ४ ते ८ किमी : ३७ रुपये
  • ८ ते १२ किमी : ४३ रुपये
  • १२ ते १८ किमी : ४९ रुपये
  • १८ किमीपेक्षा अधिक : ६२ रुपये
महामेट्रोच्या तुलनेत खिशाला अधिक कात्री

महामेट्रोच्या (पिंपरी ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी) विद्यमान मार्गांवर कमाल तिकीट दर ३५ रुपयांपर्यंत मर्यादित असताना, पुणेरी मेट्रोचे कमाल तिकीट तब्बल ६२ रुपये निश्चित करण्यात आले आहे. तसेच २ ते ८ किलोमीटरच्या टप्प्यांमध्येही हे दर महामेट्रोच्या तुलनेत सुमारे ५ ते १२ रुपयांनी महाग आहेत. पीपीपी मॉडेल आणि वाढत्या भांडवली खर्चामुळे ही दरवाढ झाली असली, तरी नियमित प्रवास करणाऱ्या आयटीयन्स व नोकरदारांच्या खिशावर याचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मेट्रो वेळापत्रक आणि फेऱ्या

मेट्रोची पहिली फेरी सकाळी ६ वाजता सुरू होईल. पीक अवर्समध्ये दर ६ मिनिटांनी, तर इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो धावेल. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयासाठी शेवटची रात्री १०.३० वाजता, तर जिल्हा न्यायालयावरून माणकडे रात्री ११.४० वाजता शेवटची गाडी सुटेल. जिल्हा न्यायालय स्थानकावर महामेट्रोच्या लाईन-१ व लाईन-२ शी थेट इंटरचेंज जोडणी देण्यात आली असून प्रवाशांसाठी संयुक्त ॲप आणि ‘एनसीएमसी’ कार्डची सोय असेल.

महिला शक्तीचे सारथ्य आणि पर्यावरणपूरक रचना

पुणेरी मेट्रोच्या सर्व गाड्यांचे सारथ्य सुमारे १०० महिला ट्रेन पायलट करणार असून, स्थानक नियंत्रक व इतर कर्मचाऱ्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक महिला असतील. प्रकल्पात ७.६० मेगावॉट सौर ऊर्जा निर्मिती क्षमता उभारण्यात आली असून ३० टक्के विजेची गरज सौर ऊर्जेवर भागवली जाईल. बांधकामात जीजीबीएस तंत्रज्ञान वापरल्याने २८ हजार टन कार्बन उत्सर्जन रोखले गेले आहे.

 “पुणेरी मेट्रो ही हिंजवडीसारख्या वेगाने वाढणाऱ्या आयटी हबला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी जीवनवाहिनी ठरेल. या सेवेमुळे हिंजवडी, बाणेर, औंध आणि शिवाजीनगर परिसरातील दैनंदिन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर फुटेल. दररोज सुमारे दोन ते अडीच लाख नागरिक या मेट्रोचा लाभ घेतील असा आमचा अंदाज आहे.” — डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए.

हे सुद्धा वाचा : चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

“प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी अल्स्टॉमच्या अत्याधुनिक वातानुकूलित गाड्या, सीबीटीसी सिग्नलिंग आणि ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महामेट्रो आणि लाईन-३ साठी संयुक्त तिकीट ॲपमुळे नागरिकांना विनाअडथळा प्रवास करणे शक्य होईल.” — अनिलकुमार सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीआयटीसीएमआरएल.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांचा धडाका; रस्ते, पदपथ, नाले अन् रुग्णालयांच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी

“प्रकल्पाच्या उभारणीत पर्यावरणाचा समतोल राखण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. २८ हजार टन कार्बन उत्सर्जन टाळण्यासोबतच ५ हजार ५०० झाडे लावण्यात आली असून ७५० झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे. गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौकातील पाषाण रॅम्पचे कामही डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल.” — रिनाज पठाण, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), पीएमआरडीए.
💡

Frequently Asked Questions

  • Que: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा कधी सुरू होणार आहे?

    Ans: पुणेरी मेट्रोचे ३ नोव्हेंबर रोजी लोकार्पण होणार असून, ४ नोव्हेंबरपासून सकाळी ६ वाजता नियमित प्रवासी सेवा सुरू होणार आहे.

  • Que: पुणेरी मेट्रोचे तिकीट दर किती असणार आहेत?

    Ans: पुणेरी मेट्रोचे तिकीट दर १२ रुपयांपासून सुरू होणार असून, १८ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी कमाल ६२ रुपये आकारले जाणार आहेत.

  • Que: पुणेरी मेट्रो मार्गावर एकूण किती स्थानके आहेत?

    Ans: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.२०३ किलोमीटरच्या मार्गावर एकूण २३ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत.

Web Title: The hinjawadi to shivajinagar metro line will be opened for passenger service nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Metro
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
1

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी
2

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला
3

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

PM Narendra Modi: महाराष्ट्राच्या पैठणीने वेधले PM मोदींचे लक्ष; केवडियातील पर्यटन दालनाला दिली भेट
4

PM Narendra Modi: महाराष्ट्राच्या पैठणीने वेधले PM मोदींचे लक्ष; केवडियातील पर्यटन दालनाला दिली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.