Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळाधंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार

Spa Nagpur Raid: नागपूरच्या अतिसंवेदनशील पॉश भागातील ‘अचरज टॉवर’ अचानक पोलिसांच्या गाड्यांनी वेढला गेला! 'ग्रेप्स स्पा'च्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापारावर गुन्हे शाखेने छापा टाकत ३ महिलांची सुटका केली. एकाला बेड्या ठोकल्या असून मुख्य संचालिका फरार झाली आहे. या हायप्रोफाईल रॅकेटचा थरारक पडदाफाश...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 25, 2026 | 12:50 PM
Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळा धंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार

Spa Nagpur Raid: स्पाच्या आड काळा धंदा! पॉश अचरज टॉवरवर धाड; ३ महिलांची सुटका, संचालिका फरार

Follow Us
Follow Us:
  • पॉश सदर भागातील ‘ग्रेप्स स्पा’वर धाड टाकून देहव्यापार रॅकेट उघड.
  • ३ पीडित महिलांची सुटका; ‘हार्दिक नागपुरे’ला अटक.
  • छापा पडताच मुख्य संचालिका गुंजन आसरे व मॅनेजर पसार.
Spa Nagpur Raid: नागपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूरमधील अतिसंवेदनशील आणि पॉश भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदर परिसरातील अचरज टॉवरमधील ‘ग्रेप्स स्पा अँड सलून’वर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SSB) गुप्त माहितीच्या आधारे या स्पावर धाड टाकून तिथे सुरू असलेल्या मोठ्या देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

तीन तरुणींची सुटका; एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, अचरज टॉवर येथील ‘ग्रेप्स स्पा अँड सलून’मध्ये स्पाच्या आड वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची पक्की बातमी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केली आणि अचानक छापेमारी केली. या कारवाईत देहव्यापारात जबरदस्तीने ढकलण्यात आलेल्या ३ तरुणींची पोलिसांनी यशस्वीरीत्या सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक तरुणी गोंदिया जिल्ह्यातील असून उर्वरित दोन महिला नागपूर शहरातीलच रहिवासी आहेत. या अवैध धंद्यात सक्रिय सहभाग असणारा आणि स्पामध्ये कर्मचारी म्हणून काम करणारा आरोपी हार्दिक नितीन नागपुरे याला पोलिसांनी घटनास्थळावरून रंगेहाथ अटक केली आहे.

हेही वाचा: Solapur Crime: शिक्षणासाठी आणलेल्या मेहुणीवर बिघडली नियत; अनैतिक संबंधांच्या त्रिकोणातून जावयाचा भयंकर शेवट!

पैशांचे आमिष अन् मुख्य संचालिका फरार!

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी गरजू आणि हवालदिल महिलांना कमी वेळेत जास्त पैसे मिळवून देण्याचे मोठे आमिष दाखवायचे. याच पैशांच्या लालसेने त्यांना या दलदलीत ढकलण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांच्या या छापेमारीची कुणकुण लागताच स्पाची मुख्य संचालिका गुंजन आसरे आणि व्यवस्थापक अन्नू जहीर हे दोघे घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. पोलीस सध्या या दोघांचा कसून शोध घेत आहेत.

सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईनंतर सदर पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या रॅकेटचे जाळे आणखी कुठे पसरले आहे का, याचा पुढील तपास सदर पोलीस करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागपूरमधील ही घटना नेमकी कुठे आणि कोणत्या स्पावर घडली?

    Ans: ही घटना नागपूरच्या पॉश सदर परिसरातील 'अचरज टॉवर'मधील ‘ग्रेप्स स्पा अँड सलून’ येथे घडली.

  • Que: या कारवाईत पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी ३ महिलांची सुटका केली, हार्दिक नागपुरे नावाच्या एका आरोपीला अटक केली, तर मुख्य संचालिका गुंजन आसरे व मॅनेजर अन्नू जहीर फरार झाले.

  • Que: महिलांना या व्यवसायात कसे आणले जात होते?

    Ans: गरजू महिलांना कमी वेळात जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना या देहव्यवसायात ढकलले जात होते.

Web Title: Nagpur spa dehvyapar karvai grapes spa sadar raid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Case
  • Nagpur Crime News
  • Raid News

संबंधित बातम्या

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी
1

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ
2

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल…
3

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल…

Kalyan News: खाकी वर्दीचा गैरवापर? मज्जाव केल्याचा राग धरत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप!
4

Kalyan News: खाकी वर्दीचा गैरवापर? मज्जाव केल्याचा राग धरत पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.