
फोटो सौजन्य सोशल मीडिया
बादल हा विद्युत कामे करणारा कुशल कामगार आहे. त्याचे लग्न झाले असून, पत्नी गर्भवती आहे, पत्नीची आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्याची आर्थिक ओढाताण सुरू होती. पत्नीला विरंगुळा मिळावा म्हणून त्याने टीव्ही आणि मोबाईल घेतला होता. मात्र, घरखर्चासह विविध वस्तूंचे मासिक हप्ते फेडताना त्याच्यावर आर्थिक ताण वाढला होता.
मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास आर्थिक परिस्थितीवरून बादल आणि पत्नीमध्ये वाद झाला. त्यामुळे बादल अधिकच व्यथित झाला. वादानंतर बादलने पत्नीला घराबाहेर काढले आणि घराचे दार आतून बंद करून घेतले त्यानंतर त्याने गळफास लावायचा प्रयत्न सुरु केला .
Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह
पोलिस हवालदार संदेश शुक्ला आणि पोलिस शिपाई ठाकूर आडे यांच्या तत्परतेचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कौतुक केले. कळमना ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे आणि पोलिस कर्मचाऱ्यांनीही दोघांचे कौतुक केले.
Nagpur Airport : १.५० लाख टनांचे लक्ष्य गाठणार कसे? कार्गो घटल्याने जीएमआरच्या योजनेसमोर मोठे आव्हान
घरातून बादलच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने शेजाऱ्याऱ्यांनी तातडीने डायल ११२वर संपर्क साधला. माहिती मिळताच कळमना पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पौहवा संदेश शुक्ला आणि पोलिस शिपाई ठाकूर आडे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले.
घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत प्रवेश करताच बादल गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला . पोलिसांनी त्याला गळफास कडून ताबडतोब खाली उतरवले आणि त्याचा जीव वाचवला .