Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे सरकार हाय हाय…गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप…, विरोधकांनी शिंदे सरकारला चोहोबाजूंनी घेरले

खोके सरकार काय म्हणतंय, गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय...शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय...महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक..गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी,मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 19, 2022 | 03:13 PM
शिंदे सरकार हाय हाय…गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप…, विरोधकांनी शिंदे सरकारला चोहोबाजूंनी घेरले
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक जोरदार आक्रमक झाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी पुन्हा एकदा पन्नास खोके, एकदम ओके म्हणत शिंदे सरकारचा निषेध केला. कर्नाटकच्या बेळगावमधील धरपकडीचेही नागपूरमध्ये तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी बोम्मई सरकारच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे सरकारला चोहोबाजूंनी घेरले. कर्नाटक सीमाप्रश्न, प्रकल्पांची पळवापळवी, शेतकरी प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले. त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरच कर्नाटक सरकार हाय हाय…बोम्मई सरकार हाय हाय…शिंदे सरकार हाय हाय…गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… पन्नास खोके, एकदम ओके म्हणत जोरदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.

नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत जोरदार निदर्शने केली. खोके सरकार काय म्हणतंय, गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय…शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय…महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक..गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी,मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

कर्नाटक सीमावादाचेही अधिवेशनात आज पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी दिली. मात्र, तो अचानक रद्द केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले. ही दडपशाही असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत आपण सीमावादप्रकरणी पाठिशी असल्याचे सांगितले. या प्रकरणावर राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Nagpur winter session first day opposition became aggressive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2022 | 03:13 PM

Topics:  

  • BJP
  • Nagpur Winter session
  • Nationalist Congress Party
  • shivsena

संबंधित बातम्या

वचननाम्यातून मराठी माणूस आणि हिंदुत्व गायब… राहुल शेवाळेंची ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जळजळीत टीका
1

वचननाम्यातून मराठी माणूस आणि हिंदुत्व गायब… राहुल शेवाळेंची ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जळजळीत टीका

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख
2

Latur Amit Deshmukh : महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला – अमित देशमुख

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन
3

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन

MNS-Shiv Sena joint Manifesto:’शिक्षणापासून महिला सक्षमीकरणापर्यंत…’; ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, घोषणांचा पाऊस
4

MNS-Shiv Sena joint Manifesto:’शिक्षणापासून महिला सक्षमीकरणापर्यंत…’; ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, घोषणांचा पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.