Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज शाळा, कॉलेजला सुट्टी; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

भारतीय हवामान खात्याने २८ ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (अतिवृष्टीचा) 'ऑरेंज अलर्ट' इशारा जारी केला आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत शहरात १०८.१ मिमी पावसाची नोंद झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 29, 2026 | 08:17 AM
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचा अतिरिक्त भार होणार आता कमी; शिक्षण विभागाकडून कडक सूचना जारी

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचा अतिरिक्त भार होणार आता कमी; शिक्षण विभागाकडून कडक सूचना जारी

Follow Us
Follow Us:

नागपूर : शहर आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यात ‘ऑरेंज अलर्ट’ही जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर जिल्हा प्रशासनाने बुधवारी (दि.२९) शासकीय आणि खाजगी शैक्षणिक संस्थांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान खात्याने २८ ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (अतिवृष्टीचा) ‘ऑरेंज अलर्ट’ इशारा जारी केला आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत शहरात १०८.१ मिमी पावसाची नोंद झाली तर सायंकाळी ५.३० पर्यंत १७९.६ मिमी पावसाची नोंद केली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २९ जुलैला होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अचानक पूर येण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमुळे आणि मुसळधार पावसामुळे कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ३० आणि ३४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने २९ जुलैला अधिकृत सुट्टीचा आदेश जारी केला आहे.

नागपूर ग्रामीण, कामठीमध्ये बंदचा आदेश लागू

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, ही सुट्टी नागपूर शहरात (नागपूर महानगरपालिका क्षेत्रासह) आणि नागपूर ग्रामीण, हिंगणा व कामठी या लगतच्या तालुक्यांमध्ये लागू राहील. या भागांतील सर्व शासकीय आणि खाजगी अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बुधवारी पूर्णपणे बंद राहतील.

व्यवस्थापन पथके सतर्क

प्रशासनाने सांगितले की, हा आदेश नागपूर विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) आणि शिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना माहितीसाठी आणि तत्काळ कारवाईसाठी पाठवला आहे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि कोणतीही संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क ठेवले आहे. हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Nagpur मध्ये सुटकेचा थरार ! ८०० विद्यार्थी तीन-चार फूट पाण्यात अडकले; मानवी साखळी करत…, पहा Video

Web Title: Schools and colleges to remain closed today due to heavy rains in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : कागदी आदेश झुगारला; प्रत्यक्ष जप्ती करा, हायकोर्टाचा दणका
1

Nagpur News : कागदी आदेश झुगारला; प्रत्यक्ष जप्ती करा, हायकोर्टाचा दणका

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…
2

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…

Nagpur News : गोल्डन रिंग रोडवर उभारणार ‘युटिलिटी कॉरिडोर’
3

Nagpur News : गोल्डन रिंग रोडवर उभारणार ‘युटिलिटी कॉरिडोर’

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी
4

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.