धक्कादायक! नागपूर शहरातील इंग्रजकालीन सिवेज लाईनबाबत महापालिका अनभिज्ञ; घरांखालील जमीन सरकण्याचा धोका
नागपुरात सर्वप्रथम 1936 मध्ये शहरातील तत्कालीन इंग्रज अधिकारी सर लेन ब्राऊन यांनी सिवेज लाईन तयार केली होती. आज या सिवेज लाईनला 89 वर्षांचा कालावधी झाला असून अनेक भागात जीर्ण झाली आहे. काल, पारडी येथील सुभाननगरातही एक जीर्ण सिवेज लाईन खचल्याने घराचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शहरातील या 89 वर्षे जुन्या जीर्ण सिवेज लाईनवरील घरांबाबत चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ही सिवेज लाईन अनेकदा अनेक ठिकाणी खचली होती. महापालिका खचलेल्या ठिकाणी या महाकाय सिवेज लाईनवर मलमपट्टी करते. परंतु या सिवेज लाईनचे शेवटचे टोक कुठे आहे, पाण नेमके कुठे जाते, याबाबत महापालिकेतील अधिकारीही अनभिज्ञ आहे. त्यामुळे उपाययोजनांवरही मर्यादा असून एखादवेळी मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुरामुळे 112 गावे तब्बल 2 महिने असतात संपर्काबाहेर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज
काल, सुभाननगर पारडी येथे सुंदर अपार्टमेंट ते नाग नदीपर्यंतची सिवेज लाईन जीर्ण झाली. त्यामुळे काल जमीन खचली. यात घराचे नुकसान झाले. हाच प्रकार मागील वर्षी याच ठिकाणी झाला होता. तेव्हाही जमीन खचली. मात्र, यापेक्षाही जुनी इंग्रजकालीन 50 फुटापेक्षा जास्त खोल व महाकाय व्यासाची सिवेज लाईन असून ती जीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे जुन्या काळात फारसे घरे नसल्याने ही सिवेज लाईन त्यावेळी मोकळ्या भागातून होती. परंतु आज यावर घरे आहेत. ही सिवेज लाईन खचल्यास मालमत्तेचीच नव्हे तर जिवीतहानीचीही शक्यता नाकारता येत नाही.
विटा व मातीने निर्मिती : विटा व मातीने तयार केलेली ब्रिटिशकालीन सिवेज लाइन अलंकार टॉकीज चौक, मेहाडिया चौक, जागनाथ बुधवारी येथे अनेकदा खचली आहे. सुदैवाने यात काही दिवस वाहतूक कोंडीचा अपवाद वगळता नागरिकांचे कुठलेही नुकसान झाले नाही. ही सिवेज लाईन नागरी वस्त्यातून जात असून आतापर्यंत अनेकदा सभागृहात त्या त्या काळातील नगरसेवकांनी जुन्या सिवेज लाईन बदलण्याची मागणी केली. परंतु या सिवेज लाईनबाबत अधिकाऱ्यांना माहिती असली तरी शेवटचे टोक अर्थात यातील पाणी कुठे जाते, याबाबत माहिती नसल्याचे त्यांच्या उत्तरातून दिसून येते.
मान्सून 3 जूनपासून नागपूरसह विदर्भात होणार दाखल? हवामान विभागाने म्हटलं…
धरमपेठ, रामदासपेठ, धंतोली, बड़ीं, महाल, इतवारी, जागनाथ बुधवारी शहराच्या या प्रमुख भागातून ही जीर्ण सिवेज लाईन आहे. हा संपूर्ण परिसर आता दाट वस्तीचा आहे. काही वर्षापूर्वी जागनाय बुधवारी ही सिवेज लाईन खचल्याने या भागातही सिवेज लाईन असल्याचे पुढे आले. त्यामुळे हि सिवेज लाईन शहराबाहेर एखाद्या नाल्यात सोडण्यात आल्याची शक्यता आहे. परंतु महापालिकेतील कुणीही अधिकारी खात्रीलायक सांगण्यास सक्षम नाही. त्यामुळे या सिवेज लाईनचे शेवटचे टोकच माहिती नाही. परिणामी एखादवेळी ही सिवेज लाईन खचल्यास त्या पुढील वस्त्यांना वाचविण्यासाठी कुठलेही नियोजन करता येणार नाही.