Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन

लाडकी बहीण योजनेचा लाभ मोठ्या संख्येने महिलांना बंद करण्यात आल्याचा आरोप करत सातारा जिल्हा महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. लाभार्थींना पुन्हा योजनेत समाविष्ट करणे, ई-केवायसी प्रक्रिया सुरू करणे आणि योजनेबाबत पारदर्शक माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Jul 21, 2026 | 07:42 PM
लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन
Follow Us
Follow Us:

सातारा, दि. २१ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिलांचा लाभ कोणतीही स्पष्ट कारणे न देता बंद करण्यात आल्याचा आरोप करत सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन लाभ बंद झालेल्या सर्व महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा राजेघोरपडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातील सुमारे ९२ लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली असून, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही मोठ्या संख्येने महिलांचा समावेश असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

योजनेला २८ जून २०२४ रोजी सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत लाभार्थी संख्येत झालेल्या बदलांची सविस्तर माहिती जाहीर करावी, प्रारंभी किती महिला लाभार्थी होत्या, सध्या किती आहेत, कोणत्या कारणांमुळे किती महिलांचा लाभ बंद करण्यात आला, तसेच योजनेसंदर्भातील सर्व शासन निर्णय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

कोरेगाव तालुक्यात रंगणार तिरंगी सामना; जिल्हा बँक सोसायटी मतदारसंघांसाठी नरसिंग दिसले मैदानात

लाभ बंद होण्यामागे ई-केवायसी हे प्रमुख कारण असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत, सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करून लाभ बंद झालेल्या महिलांना तातडीने योजनेचा लाभ पूर्ववत करावा, अशी मागणी महिला काँग्रेसने केली. याशिवाय लाभ बंद करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या १२ निकषांचा फेरविचार करून सुरुवातीला ज्या सर्व महिलांना योजना मंजूर करण्यात आली होती, त्या सर्वांना पुन्हा सरसकट लाभ द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.

मोर्चानंतर देण्यात आलेल्या निवेदनावेळी मनीषा साळुंखे, अनिता जाधव, मालन परळकर, उज्वला सुतार, धनश्री मालुसरे, शोभा गोळे, नाझनीन फकीर, माधवी वर्पे, अंजली कांबळे, हजरा शिकलगार, लीना सातपुते, नाजिम इनामदार, श्रीकांत कांबळे, विनय मोरे, अमोल शिंदे, ऋषिराज मोहिते, अविनाश खापे, सतीश सुतार, संतोष डांगे यांच्यासह लाभ बंद झालेल्या शेकडो महिला उपस्थित होत्या.

Buldhana News : एसटी बसस्थानक परिसरात वृक्षारोपण! राज्य परिवहन विभागीय कार्यालयातर्फे पर्यावरणाचा संदेश

Web Title: Ladki bahin yojana benefit restart women congress morcha satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा
1

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
2

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
3

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
4

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.