Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : नांदेड अर्थसंकल्प अभ्यासात अडकला; सर्वसाधारण सभेसमोर कधी सादर होणार सादर?

नांदेड वाघाळा महापालिकेचा अर्थसंकल्प सध्या स्थायी समितीच्या 'अभ्यासा' तच अडकून पडल्याचे चित्र दिसत आहे. अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला नाही,

  • By प्रीति माने
Updated On: Apr 17, 2026 | 02:50 PM
Nanded-Waghala Municipal Corporation budget has not been presented due to the Standing Committee

Nanded-Waghala Municipal Corporation budget has not been presented due to the Standing Committee

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सध्या स्थायी समितीच्या ‘अभ्यासा’ तच अडकून पडल्याचे चित्र दिसत आहे. पंधरा ते वीस दिवस उलटूनही अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यात आलेला नसल्याने या विलंबाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात स्थायी समितीचे सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्याकडे अर्थसंकल्प सुपूर्द केला होता. त्यानंतर स्थायी समितीच्या’ हुशार’ सदस्यांनी सविस्तर अभ्यासासाठी वेळ मागितला होता, मात्र, नियमानुसार ३१ मार्चपर्यंत अर्थसंकल्प सभेसमोर मांडणे बंधनकारक असताना तो अद्याप सादर झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर मनपा वर्तुळात विविध चांना उधाण आले आहे. अर्थसंकल्प रखडविण्यामागील नेमके कारण काय, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. शासन नियमांनुसार, ३१ मार्चपर्यंत स्थायी समितीकडून अर्थसंकल्प सादर न झाल्यास आयुक्तांनी सादर केलेलाच अर्थसंकल्प अंतिम मानला जातो.तरीही या दिशेने प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही.

हे देखील वाचा : “BJP ने काही भुंकणारी कुत्री पाळली आहेत…: MP संजय राऊतांचे निशिकांत दुबेंवर टीकास्त्र

आणखी किती दिवस करणार अभ्यास

स्थायी समितीकडून अर्थसंकल्पाचा ‘अभ्यास’ नेमका आणखी किती दिवस चालणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या विलंबामुळे स्थायी समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोन तीन दिवसात अर्थसंकल्प सादर करणार

आयुक्त यांनी स्थायी समितीकडे अर्थसंकल्प सादर केला आहे, परंतु अंदाज समितीचा दौरा, जयंती उत्सव याच्या नियोजनामुळे मनपाचा अर्थसंकल्प सभेसमोर सादर होवू शकला नाही. येत्या दोन तीन दिवसात सर्व सदस्यांशी चर्चा करून अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी प्रतिक्रिया स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी व्यक्त केली.

हे देखील वाचा : सुषमा अंधारेंनी अभिनेत्री प्राजक्ता माळीला धरले धारेवर; “महिला अत्याचारावर ब्र शब्द नाही अन्…

प्रणिताताई देवरे प्रदेश पातळीवर भाजपात सक्रिय

भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे चिखलीकर प्रदेश स्तरावरील कार्यक्रमांना उपस्थित राहत असून जिल्ह्यात मात्र त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. नारी शक्ति वंदन विधेयकाच्या निमित्ताने प्रदेश स्तरावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या समवेत पत्रकार परिषदेत त्या उपस्थित होत्या. मात्र नांदेड जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यक्रमांना त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. नांदेड जिल्ह्यातील नेतृत्व विशेषत्वाने महिला आघाडीच्या कार्यक्रमांना त्यांना बोलावत नसल्याची माहिती मिळत आहे.

भारत मातेच्या मातृशक्तीची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखलेली असल्यामुळे विकसित भारताच्या निर्मितीसाठी नारीशक्ती वंदन विधेयकाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असून महिलांना ३३ टक्के आरक्षण राजकारणात मिळणार आहे. भारताच्या संसदेमध्ये महिलांचा सहभाग केवळ १४ % राहिल्यामुळे महिला सशक्तीकरणाच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. या विधेयकामुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळेल.

Web Title: Nanded waghala municipal corporation budget has not been presented due to the standing committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • budget 2026
  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.