Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : वादाची ठिणगी, संघर्षाचा ज्वालामुखी; नांदेड – परभणी भाजपमध्ये उफाळला असंतोष

Nanded BJP Politics : नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांतील गटबाजी आता उघडपणे समोर आल्याने पक्षश्रेष्ठी चिंतेत असल्याचे सांगितले जाते. नांदेडमध्ये संघटनात्मक पातळीवर दोन स्पष्ट गट निर्माण झाल्याची चर्चा आहे

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2026 | 02:27 PM
Internal disputes and factionalism are reported in BJP Nanded and Parbhani political news

Internal disputes and factionalism are reported in BJP Nanded and Parbhani political news

Follow Us
Follow Us:

Nanded Political News : नांदेड: मराठवाड्‌यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात वाढत चाललेल्या अंतर्गत संघर्षांची प्रदेश नेतृत्वाने गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांतील गटबाजी आता उघडपणे समोर आल्याने पक्षश्रेष्ठी चिंतेत असल्याचे सांगितले जाते. (BJP Politics) नांदेडमध्ये संघटनात्मक पातळीवर दोन स्पष्ट गट निर्माण झाल्याची चर्चा असून, एका गटाच्या कार्यक्रमांना दुसरा गट सातत्याने अनुपस्थित राहत असल्याने पक्षातील विसंवाद अधिक ठळक झाला आहे.

पक्षवाढीपेक्षा अंतर्गत शक्तीप्रदर्शनालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना कार्यकत्यांत व्यक्त होत आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये काही राज्यस्तरीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे महापालिकेतील नगरसेवक विरुद्ध भाजपाचे स्थानिक पदाधिकारी असा उभा संघर्ष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत या प्रकरणाची चांगलीच झाडाझडती झाल्याचे समजते. प्रदेशाध्यक्षांच्या समोर एका नेत्याने नगरसेवकाला ‘मीच तुला उमेदवारी मिळवून दिली, त्यामुळे तू शांत रहा’ अशी भाषा वापरल्याने वातावरण चिघळल्याचे समजते. दरम्यान, परभणीत परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. तेथे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे विरुद्ध ११ नगरसेवक असा थेट संघर्ष पेटला आहे.

हे देखील वाचा : “10 मिनिटांमध्ये आलोच…! महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर

नगरसेवकांच्या निलंबनाची केली मागणी

पक्षशिस्त भंग केल्याचा आरोप करत संबंधित नगरसेवकांविरोधात निलंबनाची मागणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आल्याचे समजते. स्थापना दिन, पत्रकार परिषद, प्रशिक्षण कार्यशाळा आणि विविध बैठका अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांना काही नगरसेवक सातत्याने गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संघटनात्मक शिस्त ढासळत असल्याचा आरोप केला जात आहे. महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीवरूनही वाद टोकाला गेला. परभणीतील हा वाद केवळ व्यक्तीगत संघर्ष नसून संघटनात्मक शिथिलतेचे लक्षण मानले जात आहे.

जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक आमनेसामने आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. गटबाजी अधिक तीव होऊन पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो. यामुळे महापालिकेत स्थायी समिती, स्वीकृत सदस्य, विकासनिधी वाटप आणि स्थानिक प्रश्नांवरील निर्णय रखडण्याची शक्यता वाढली आहे. नगरसेवकांचे लक्ष जनतेच्या कामांपेक्षा अंतर्गत राजकारणाकडे वळल्यास नागरिकांमध्ये नाराजी वाढण्याची भीती आहे.

हे देखील वाचा : नितीन गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी! नागपूर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

आगामी निवडणुकीत दुष्परिणामाची भीती

विरोधकांना सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करण्याची संधीही मिळू शकते. वेळेत मध्यस्थी न झाल्यास आगामी निवडणुकांवर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील बैठकीत या वादामागे काही नेत्यांचा अवाजवी हस्तक्षेप असल्याची चर्चा झाली असून, प्रदेश नेतृत्वाने दोन्ही जिल्ह्यांतील परिस्थितीवर स्वतंत्र अहवाल मागविल्याचे समजते. एकूणच, बाहेर विरोधकांशी लढण्यापूर्वी भाजपासमोर आता स्वतःच्या घरातील कलह आवरण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title: Internal disputes and factionalism are reported in bjp nanded and parbhani political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • BJP Politics
  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार? राज्यांमध्ये जनगणनेच्या कामाला गती
1

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार? राज्यांमध्ये जनगणनेच्या कामाला गती

पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; पिकांची वाढ खुंटली, राहेर परिसरात दुष्काळाचे सावट
2

पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; पिकांची वाढ खुंटली, राहेर परिसरात दुष्काळाचे सावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.