Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली परीक्षा केंद्राची पाहणी; प्रशासनाकडून कॉपीमुक्ती अभियान सुरु

बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 18, 2026 | 04:49 PM
मोठी बातमी ! MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली; आता 5 एप्रिल ते 2 मेदरम्यान होणार परीक्षा

मोठी बातमी ! MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली; आता 5 एप्रिल ते 2 मेदरम्यान होणार परीक्षा

Follow Us
Close
Follow Us:

Nanded News : नांदेड : राज्यामध्ये सध्या उच्च माध्यमित प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. (HSC Exam) भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा केंद्रावरील प्रश्नपत्रिका सुरक्षित साठवणूक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, विद्याथ्यांची बैठक व्यवस्था, परीक्षा हॉलमधील शिस्त, तसेच पर्यवेक्षकांची उपस्थिती यांची पाहणी केली. परीक्षा सुरळीत, पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी केंद्रावर करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. (Nanded News)

विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी पाहिले.

हे देखील वाचा : ‘स्थायी’साठी जोरदार हालचाली; नांदेड महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी हाती घेण्यासाठी अनेक जण इच्छुक

नियमांचे काटेकोरपणे पालन करावे

केंद्रप्रमुख व शिक्षकांनी जबाबदारीने व पद्धतीने नियोजनबद्ध परीक्षा व्यवस्थापन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कर्डिले यांनी त्यांचे कौतुक केले.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांनी याच पद्धतीने काटेकोरपणे नियमांचे पालन करून परीक्षा पार पाडाव्यात, तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला बळी न पडता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हे देखील वाचा : Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?

जलशुद्धीकरण केंद्राचा आढावा

नांदेडच्या महापौर कविता मुळे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी काबरानगर जलशुद्धीकरण केंद्र येथे प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. महापौरांनी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, यंत्रसामग्रीची स्थिती, गाळ उपसण्याची पद्धत आणि साठवणूक टाक्यांची तपासणी करून शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. तसेच काबरानगर ते देगलूर नाका दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीतील गळती दुरुस्ती आणि इतर प्रलंबित तांत्रिक कार्माबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला.

पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे दिले निर्देश

पाणीपुरवठा विभागातील त्रुटी दूर करून नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या भेटीदरम्यान सभागृह नेते महेश कनकदंडे, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, शहर अभियंता सुमंत पाटील, उपअभियंता खुशाल कदम, कनिष्ठ अभियंता राजकुमार बोडके, पंप ऑपरेटर मंगेश देशमुख, संतोष गुमलवार आणि पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: Nanded district collector rahul kardile visited the examination center due to the 12th exams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • hsc exam
  • HSC Exam 2026
  • nanded news

संबंधित बातम्या

Parbhani News : परभणी रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत; RPF जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव
1

Parbhani News : परभणी रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत; RPF जवानाने वाचवला प्रवाशाचा जीव

Nanded Gangwar : नांदेडचे पालकमंत्री आहेत कुठे गायब? वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये धास्ती अन् असुरक्षितता
2

Nanded Gangwar : नांदेडचे पालकमंत्री आहेत कुठे गायब? वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये धास्ती अन् असुरक्षितता

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या
3

Nanded Crime : नांदेड हादरलं! मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या

Crime News : नांदेड शहरावर गुन्हेगारीचे सावट झाले गडद; गँगवॉरमुळे शहराची शांतता आली धोक्यात
4

Crime News : नांदेड शहरावर गुन्हेगारीचे सावट झाले गडद; गँगवॉरमुळे शहराची शांतता आली धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.