
Politics intensifies in Pathri taluka for Zilla Parishad and Panchayat Samiti elections
पाथरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यात मंगळवारी (दि. २१) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच तहसील व संबंधित कार्यालय परिसरात उमेदवार, कार्यकर्ते व नेतेमंडळींची मोठी गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या गजरात, पक्षीय घोषणांमध्ये आणि भव्य शक्तीप्रदर्शनात विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपापले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, काँग्रेसकडून डॉ. जगदीश शिंदे तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी मोठ्या ताकदीने उपस्थिती लावत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, तसेच शिवसेनेचे दोन्ही गट (उद्धव ठाकरे गट व शिंदे गट) या निवडणुकीत प्रतिष्ठेची लढाई लढत असून, सर्वच गटांकडून तगडे उमेदवार मैदानात उतरले आहेत.
हे देखील वाचा : 50 दिवसांपासून बेपत्ता झालेले मंत्र्यांचे सुपुत्र अखेर पोलिसांना शरण! महाड निवडणूक मारहाण प्रकरणात ट्वीस्ट
२१ जानेवारी अखेरपर्यंत जिल्हा परिषद गटांसाठी ५७ तर पंचायत समिती गणांसाठी ९८ अशी एकूण १५५ उमेदवारी नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली असून, स्पर्धा अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. नामनिर्देशन दाखल झाले असले तरी, अद्याप युतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. कोणत्या पक्षाची कोणत्या जागेवर कोणाशी युती आहे, कुठे आघाडी तर कुठे थेट लढत होणार, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत अनेक राजकीय हालचाली घडणार असून, मैत्री, बंडखोरी आणि माघारी यामधूनच तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे खरे राजकीय चित्र उभे राहणार आहे.
पंचायत समिती गण प्राप्त नामनिर्देशन
हदगाव बु. १३, रेणाखळी १३, देवनांद्रा- ११. देवेगाव- ११. कासापुरी – १२. रामपुरी खुर्द ७, बाभळगाव ९. कानसूर ११, लिंबा ४, वाघाळा ७, एकूण ९८
जिल्हा परिषद गट प्राप्त नामनिर्देशन
हदगाव १२, देवनांद्रा १४, कासापुरी १२, बाभळगाव १२, लिंबा ७, एकूण ५७
हे देखील वाचा : नांदेड महापालिकेवर महिला राज; नवा महापौर कोण होणार? या नगरसेविकांची नावे चर्चेत
अवैध रेती पकडूनही सोडली ? धर्माबादात संबंधितांची संशयास्पद भमिकाः चौकशीची मागणी
लोहा व नायगाव तालुक्यात अवैध रेती व मुरूम वाहतुकीविरोधात रात्री अपरात्री छापे टाकत कठोर कारवाई करत असताना, धर्माबाद तालुक्यात मात्र महसूल प्रशासनाचाच वेगळा चेहरा समोर येत आहे. मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी अवैध रेती/मुरूम वाहतूक पकडूनही काही वेळातच आर्थिक तडजोड करून वाहन सोडल्याचा गंभीर आरोप होत असून, यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाचे ढग दाटले आहेत. दोन दिवसांपूर्वी पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास बाभळी ब्रिज ते बाभळी गावाजवळ एमएच २६/१२८० क्रमांकाचा हायवा अवैधरीत्या रेती/मुरूम वाहतूक करत असताना पकडण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र, सदर वाहनावर कोणतीही अधिकृत कारवाई, जप्ती अथवा दंड न करता संबंधित चालक व वाहन मालकांकडून मोठी आर्थिक रक्कम घेऊन हायवा मोकळा सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, संबंधित मंडळ अधिकारी व चार तलाठी बॅलोनो कारमधून घटनास्थळी दाखल झाले; परंतु कोणतीही लेखी नोंद, पंचनामा किंवा वरिष्ठांना कळविण्याची तसदी न घेता तडजोडीनंतर घटनास्थळावरून निघून गेल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. एकीकडे जिल्हाधिकारी स्वतः फिल्डवर उतरून कारवाई करत असताना, दुसरीकडे धर्माबाद तालुक्यात महसूल अधिकारीच नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.