मुंबई – शिवसेना (Shivsena) व शिंदे गटाचा (Shinde group) दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) राज्यात राजकीय वातावरण तापल्याचे सर्वांनी पाहिले. आता शिंदे गटातील दसरा मेळावा व उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) शिवसेनेचा दसरा मेळावा यावरुन प्रतिक्रिया येत असताना, ऐकमेकांवर टिकाही केली जात आहे. दरम्यान, आज केंद्रियमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत काही गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.
दसरा मेळाव्यात तमाशा व शिव्या
राणे सुरुवातीला बोलताना दसरा मेळाव्यावरुन टिका करताना म्हणाले की, दसरा मेळावा शिमग्यासारखा झाला, मेळाव्यात कोणताही विचार नाही, शिव्या देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. दसरा मेळाव्यात बाळासाहेब हे विचारांचे सोनं द्याचे, आम्हाला बाळासाहेबांकडून विचारांची मेजवानी मिळायची. कामाची प्रेरणा मिळायची. आमची जडणघडण झाली, आणि आजपर्यंत आम्ही येथेपर्यंत पोहलो, ते फक्त बाळासाहेबांमुळेच. पण परवा शिवाजी पार्कवर फक्त तमाशा व शिव्याच दिसल्या अशी टिका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
अपघाताने मुख्यमंत्री झाले
पुढे बोलताना राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे फक्त मोठ्या माणसांवर टिका करायची एवढेच माहित आहे, मोदींवर, शाहांवर, मोहन भागवत यांच्यावर टिका केली. मोठ्या माणसांवर टिका केली म्हणजे तुम्ही मोठं होत नाही. त्यांना कोणीतरी हे सांगितले पाहिजे, असं राणेंनी ठाकरेंवर प्रहार केला. तुम्ही अपघातांनी मुख्यमंत्री झालात, अडीच वर्षात फक्त अडीच तास काम केला. तुमचे कर्तृत्व काय, तुमची पात्रता काय, दसरा मेळाव्यात बोलायला उभे राहिले, तेव्हा लोकं उठून जात होती, तुम्हाला काय येत नाही तर, तुम्ही मुख्यमंत्री झालात कशाला. हा दसरा मेळाव्यावर फक्त तमाशा बघायला मिळाला. अशी बोचरी टिका राणेंनी उद्धव यांच्यावर केली.
भाजपासोबत गद्दारी
पूर्वीच्या दसरा मेळाव्यात हे वेगळा जोश आणि उत्साह होता. आताच्या उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात काहीही वैचारिक, विधायक कामांची चर्चा नाही, या मेळाव्यात, पोकळ वल्गना, शिव्या होत्या. आमच्या नेत्यांवर शिव्या देत टिका केली. मी याआधी सांगितले आहे, या राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडला तर याला उद्धव ठाकरे जबाबदार असतील. त्यामुळं शिव्या देणं टाळा. थोडीतरी मर्याद राखा, वीस मिनिटापेक्षा अधिक हे चालू शकत नाही, मग तुम्ही काम कसं करणार. निवडणुकीत मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आला आणि आता मोदींवर टिका करता. जे निवडणुकीच्या आधी ठरलं होतं, तसे हे वागले नाहीत, भाजपासोबत गद्दारी केली, अशी घणाघाती टिका राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
हा लबाड लांडगा…आयत्या बिळावर नागोबा
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबद्दल बोलूच नये, यांचं बेगडी हिंदुत्व आहे. 2019 साली मोदिंचं नाव सांगून शिवसेनेचे आमदार निवडून आले. मुख्यमंत्र्यांसाठी यांनी युती तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. हा लबाड लांडगा आहे, हे खूप खोटे बोलतात. मला साहेबांनी घडवला आहे. रक्तारक्तात स्वाभिमान आहे. मला जीवे मारण्याची धमकी दिलीत. पण मी सर्वांना पुरुन उरेन. ही शिवसेना शिवसैनिकांनी वाढवली. शिवसैनिकांनी शिवसेना वाढवण्यासाठी अंगावर केसेस घेतल्या. उद्धव ठाकरे तुमचे योगदान काय आहे? जेव्हा दंगली झाल्या तेव्हा तुम्ही कुठे होता? उद्धव ठाकरे तुम्ही कधी कुणाला कानाखाली तरी मारलाय का? एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर चुकलं कुठे? शिंदेंचं शिवसेनेत मोठं योगदान आहे, तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात. अशी जहरी टिका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
सॅलियान प्रकरणात आदित्यचा हात?
पुढे राणेंनी दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंनी शिंदे कुटुंबावर केलेल्या टिकेला उत्तर देताना म्हणाले की, दिड वर्षाच्या मुलावर तुम्ही बोलता लाज वाटत नाही का, शिंदे कुटुंबानी शिवसेनेसाठी मेहनत घेतली तुम्ही काय केलेत? बाळासाहेबांनी आमची काळजी घेतली. मराठी माणसासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? सामनाचं उत्पन्न काय? उद्धव ठाकरेंच उत्पन्न काय हे त्यांनी सांगावे? कोरोनाकाळात सामनाने 42 गुंतवले व 11 कोटी कमावले. मराठी माणूस मुंबईतून कमी होतोय. याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, दसराऱ्याला शूभ बोलायचे असते,पण हे कधी शुभ बोलतच नाहीत. दिशा सॅलियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याची चर्चा आहे. असा गंभीर आरोप सुद्धा नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर केला.