Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…अन्यथा जनआंदोलनास तयार रहा,” खासदार नरेश म्हस्के यांचा मध्य रेल्वेला इशारा

ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे सुविधांबाबत खासदार नरेश म्हस्के आक्रमक झाले आहेत. लवकर यात सुधारणा न झाल्यास त्यांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 16, 2025 | 07:26 PM
"...अन्यथा जनआंदोलनास तयार रहा," खासदार नरेश म्हस्के यांचा मध्य रेल्वेला इशारा

"...अन्यथा जनआंदोलनास तयार रहा," खासदार नरेश म्हस्के यांचा मध्य रेल्वेला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मुलभूत सोयीसुविधा देण्यात मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगलाच दम देत लवकरात लवकर विकासकामे पूर्ण न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आरएलडीएच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी डीपीआर मास्टर प्लॅनच्या माध्यमातून ९५० कोटी रुपयांचा प्रस्ताव २६ मे २०२३ रोजी रेल्वे प्राधिकरणाने पाठविला आहे. मी निवडून आल्यापासून या विकासकामासाठी नियमित पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरु न झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. या बैठकीला डीजीएम के. के. मिश्रा, डीआरएम हरीश मीना, एस. एस. गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Operation Muskaan मुळे ४१,१९३ लहान मुला-मुलींच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’, मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

प्रवाशांना अधिक सुविधा देण्याची मागणी

ठाणे ते मुंबई (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या फलाटावर अजून एक पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे.

  • महिलांसाठी फलाट क्र. १० वर छताची सुविधा: पावसाळ्यात महिलांना त्रास होतोय, त्यामुळे त्वरित छत बांधावे.
  • पादचारी पूल: फलाट क्र. १ ते ७-८ तसेच क्र. ५ ते १० जोडणाऱ्या पादचारी पुलांची पुनर्बांधणी आणि नवीन पूल उभारणी तातडीने करावी.
  • वर्तकनगर आरक्षण केंद्र सुधारणा: पुरुष व महिला शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, खिडक्या, रंगकाम, बैठक व्यवस्था व वायरिंग इ. कामे त्वरीत करावीत.

सिडको आणि मध्य रेल्वे प्रशासानाचा खासदार नरेश म्हस्के समन्वय साधणार

नवी मुंबईतील स्टेशनांची उभारणी सिडकोने केली असली तरी सेवा मध्य रेल्वे देते. परंतु दोन्ही संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने स्थानकांची परिस्थिती दयनीय आहे. प्रवाशांच्या सततच्या तक्रारींवर कारवाई न झाल्यास कायदा हातात घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही खासदार म्हस्के यांनी दिला. यानंतर महाप्रबंधक मीना व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून संयुक्त बैठक घेण्याचे ठरले.

Fake currency In Maharashtra: नोटबंदीनंतरही बनावट नोटांचा सुळसुळाट, पुणे आणि भिवंडी ‘हॉटस्पॉट’; फडणवीसांची कबुली

दिघा रेल्वे स्थानक ते वाशी रेल्वे स्थानक दरम्यानच्या (दिघा, ऐरोली, सानपाडा) स्थानकांतील सोयी सुविधा आणि सुधारणांसाठीही खासदार नरेश म्हस्के यांनी सूचना केल्या.

मध्य रेल्वे, मुंबई विभागाने दिघा ते ठाणे स्थानका दरम्यानच्या ट्रकच्या अप-डाऊन लाईनवरील वर आणि खाली जाणाऱ्या जुळ्या (फक्त दुचाकी/तीन चाकी वाहनांसाठी) भुयारी मार्गांसाठी प्रस्ताव पाठवला आहे. हे भुयारी मार्ग लवकरात लवकर होणे आवश्यक असून भुयारी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना ट्रॅक ओलांडावा लागत असून अपघात होत असल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली.

दिघा रेल्वे स्थानकात छत, पंखे, दिवे आणि ध्वनिक्षेपकाची दुरुस्ती, रेल्वे स्टेशन बाहेर ब्लॉक बसविणे, तसेच दिघा, ऐरोली आणि कोपरखैरणे या स्थानकांवर एस्कलेटरची सुविधा, ऐरोली स्थानकावर आरक्षण खिडकी सुरू करणे, रबाळे पश्चिम कडील तिकीट खिडकी रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवणे, सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे काम पुन्हा सुरू करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

वाशी ते बेलापूर, तुर्भे ते ऐरोली आणि बामनडोंगरी ते खारकोपर या सर्व रेल्वे स्थानकांवरील रेल्वे फलाट, रेल्वे कार्यालयांच्या आजूबाजूचा परिसराची सुधारणा करणे आवश्यक असल्याची बाब  खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

Web Title: Naresh mhaske on central railway services

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 07:24 PM

Topics:  

  • central railway
  • Marathi News
  • Naresh Mhaske
  • Navi Mumbai
  • Thane news

संबंधित बातम्या

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
1

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण
2

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात
3

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप
4

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.