Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नेरुळ एल.पी. नाका पुलाखाली साचलेल्या पावसाच्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि देखभाल कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2026 | 02:03 PM
नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • एल.पी. नाका करंट दुर्घटनेला राजकीय वळण
  • निष्काळजी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मनसेची मागणी
  • संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर FIRची मागणी
सावन वैश्य / नवी मुंबई : नेरुळ एल.पी. नाका पुलाखाली पावसाच्या पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याच्या घटनेनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील संबंधित अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि देखभाल कंत्राटदारांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

या संदर्भात मनसेचे शहराध्यक्ष तथा प्रवक्ते गजानन श्रीकृष्ण काळे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) मयूर भुजबळ यांना निवेदन सादर केले. निवेदनात या घटनेला संबंधित यंत्रणेच्या गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण म्हटले असून, सार्वजनिक ठिकाणी पथदिव्यांच्या विद्युत यंत्रणेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात झालेल्या हलगर्जीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर

महावितरणने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार संबंधित पथदिवा, वीजजोडणी आणि आउटगोइंग केबल ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असून त्यांची देखभाल करण्याची जबाबदारीही महापालिकेची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची फौजदारी चौकशी करून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावरील सदोष केबल, मीटर बॉक्स, विद्युत सुरक्षा उपकरणे, सीसीटीव्ही फुटेज, देखभाल नोंदी, सुरक्षा तपासणी अहवाल आणि कंत्राटाशी संबंधित कागदपत्रे तातडीने जप्त करून वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्याचीही मागणी मनसेने केली आहे.

दरम्यान, विजेचा धक्का लागलेल्या दोन्ही विद्यार्थिनींवर वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनातून दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्याच रस्त्यावर एल.पी. ब्रिज खाली जवळील बिकानेर स्वीट्समोर इलेक्ट्रिक वायर तुटून शॉर्टसर्किट झालं. त्याचा झटका दोन स्कूटरवरून जाणाऱ्या विद्यार्थिनींना लागला.

Mumbai-Nashik Highway Traffic Jam: पावसाचा हाहाकार! मुंबई-नाशिक …

Web Title: Nerul electric shock case mns demands fir against nmmc officials contractors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • MNS
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग
1

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला! कोळी बांधवांनी सजवल्या होड्या, कोळीवाड्यात सणाची लगबग

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त
2

Navi Mumbai News: महापे एमआयडीसीतील 3 डेअरींवर FDAचा छापा; 12 लाखांहून अधिक किमतीचे दूध-दुग्धजन्य पदार्थ जप्त

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
3

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
4

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.