Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आ रे रे, उद्धव ठाकरे… काय तुमची दिल्लीत किंमत?” नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टिका

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले आहेत. मात्र, या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगत बसल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर आता नरेश म्हस्के यांनी ठाकरेंवर घणाघाती टिका केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 08, 2025 | 06:45 PM
नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टिका (फोटो सौजन्य-X)

नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टिका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

मुंबई : औरंगजेबाच्या 50 व्या वाढदिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा, दिल्ली येथे आमंत्रित केले गेले होते. परंतु तिथल्या दरबारात त्यांना 4000 मनसबदारी असलेल्या सरदारांच्या रांगेत बसवल्यानंतर त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि हा अपमान वाटल्याने ते तिथून निघून गेले. अपमानाने पेटून उठणारे शिवाजी महाराज कुठे आणि शिवाजी महाराजांचे नाव घेणारे मित्र पक्षांच्या बैठकीत शेवटच्या रांगेत ढकलले गेले तरीही बसून राहणारे उद्धव ठाकरे कुठे, ही दृश्ये महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असल्याची घणाघाती टिका शिवसेना मुख्य प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

“संभाजी भिडे आणि समर्थकांना अटक करा”; RPI ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांची मागणी

एकीकडे शिवाजी महाराजांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे त्यांच्या प्रत्येक आदर्शांना हरताळ फासत जायचा हेच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस बरोबर गेल्यानंतर सुरू केले आहे. ज्यांचे वारसदार ते स्वत:ला म्हणतात त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक विचाराला काळे फासण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. ज्यांना ते गद्दार गद्दार म्हणून हिणवतात त्या शिंदे साहेबांनी मात्र प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचा, शिवसेनेचा, बाळासाहेबांचा, शिवरायांचा मान राखण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न केला असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

दोन पक्षांची तुलना करा खरी शिवसेना जिला मित्र पक्षांकडून, मित्र पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून मान मिळतो, सन्मान होतो, निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जातं आणि शिवसेना उबाठा गटाला दिल्लीत जाऊन राहुल गांधी कसं वागवतात ते साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांचे मित्र पक्ष असलेले काँग्रेस आणि शरद पवार गट त्यांच्याशी कसे वागतात हे अनेक वायरल व्हिडिओ मधून समोर असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

आदरणीय बाळासाहेबांनी अत्यंत कष्टाने वाढलेला वटवृक्ष उद्धव ठाकरेंनी आपल्या चुकीचा निर्णय आणि कृतीने पोखरून टाकला. त्यांच्याबरोबर असलेले, आजूबाजूला वावरणारे कोल्हे हा वृक्ष पाडायचा दररोज प्रयत्न करतात. त्यांचे 40 आमदार आणि खासदार त्यांना सोडून निघून गेले. त्या पुढच्या निवडणुकीत पक्षाची पूर्ती वाट लागली तरीही उद्धव ठाकरे यांना जाग येत नाही, हे दुर्दैव असल्याची टिका खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

बैठकीनंतर संजय राऊत यांना भांडी घासायला सांगण्यात आली होती, अशी पक्की खबर आमच्याकडे आहे. मी भांडी घासतो पण माझा फोटो कुणी काढायचा नाही, ही गांजा राऊतची अट मान्य करण्यात आली. त्यानंतर गांज्या राऊतने भांडी घासली. जोपर्यंत राऊत सगळी भांडी घासत नाही तोपर्यंत उबाठा आणि त्यांच्या लेकाला बाहेर सोडले जात नव्हते असंही कळलंय. महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे…थोडा जरी स्वाभिमान, आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे अशी उपरोधिक टिकाही खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Eknath Shinde News: दिल्लीत एकनाथ शिंदेंची खरडपट्टी; अमित शाहांच्या इशाऱ्याने राज्यात राजकारण तापणार

Web Title: Naresh mhaske on criticism of uddhav thackeray maharashtra political

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • Maharashtra Political
  • Naresh Mhaske
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
2

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
3

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान
4

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.