ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : विकृत माणूस संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले पाहिजे. देशद्रोही सर्वसामान्यांना अपमानित करणे, संविधानाच्या विरोधात काम करणारे, महिलाविरोधी बोलणारे संभाजी भिडे विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आर पी आयचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आठवले गटाचे नेते वाघमारे यांनी महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी आहे. आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशावरून ठाणे जिल्हा आर पी आय कार्यकारणी आणि पदाधिकारी यांची एक बैठक गुरुवारी संपन्न झाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे केंद्रीय सचिव व ठाणे पालघर निरीक्षक साहेबराव बारशिंगे, ठाणे शहर निरीक्षक साहेब राव सुरवाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालीसदर कार्यक्रम प्रसंगी विमल सातपुते यांची आठवले गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रात १० टक्के स्तततेचा वाटा दिला पाहिजे अशी मागणी आम्ही महायुतीकडे केली आहे. १३१ पैकी १३ जागा ओपन,ओबीसी, एससी, एसटी महिलांसाठी प्रत्येक प्रभागात आमची मागणी आहे.आम्ही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवणुकीत आणि विधानसभा निवणुकीत महायुतीच्या उमेदवाराला जिकंण्यासाठी आम्ही जीवाचा रान केले आहे त्यामुळे आम्हाला १० टक्के सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे . महायुतीकडून विधानसभा आणि लोकसभेसाठी आम्हाला एकही जागा दिलीं नाही. प्रत्येक विभागात एक ते दोन जागेची आम्ही मागणी केली आहे. आमचा मतदार झोपडपट्टी ते बिल्डींगमध्ये विखुरलेला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत दगा फटका होणार नाही, बिल्डिंगचे मतदार बाहेर पडत नाहीत आमच्या झोपडपट्टीचा मतदार आहे चाळीमध्ये राहणारा मतदार आहे मध्यमवर्गीय मतदार आहे तो मतदानाला उतरतो महायुतीचा निरोप आला आहे आमच्यासोबत युती करणार आहेत आम्ही पॉझिटिव्ह लाहोटी.आम्ही विरोधात बोलत नाही.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे केंद्रीय सचिव व ठाणे पालघर निरीक्षक साहेबराव बारशिंगे, ठाणे शहर निरीक्षक साहेब राव सुरवाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर प्रसंगी भास्कर वाघमारे सोबत जनरल सेक्रेटरी प्रमोद इंगळे, कार्याध्यक्ष प्रल्हाद मगरे, खजिनदार तात्याराम झेंडे, बबन केदारे, दत्तू जानराव, शहाजी दुपारबुडे, शितल बनसोडे, छाया सुरवसे, पार्वती जाधव महिला कार्यध्यक्षा सुमन इंगळे, उपध्यक्षा विमल सोनावणे,उपध्यक्षा कुसूम धोत्रे, तसेच युवक अध्यक्ष विनोद भालेराव, युवक सरचिटणीस अशोक कांबळे, युवक कार्याध्यक्ष विशाल ढेंगळे, आदी पदाधिकारी मान्यवर, कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.