Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Naresh Mhaske : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत मोर्चाची घोषणा केली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि अभिजीत दिपके यांच्यावर टीका करत जोरदार पलटवार केला.

  • By विवेक
Updated On: Sep 29, 2026 | 07:33 PM
Naresh Mhaske on Raj and Uddhav Thackeray

Naresh Mhaske on Raj and Uddhav Thackeray

Follow Us
Follow Us:
  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा काढणार आहेत.
  • नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि अभिजीत दिपके यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
  • “उद्धव ठाकरे अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करत आहेत,” असा टोला म्हस्केंनी लगावला.
 

Naresh Mhaske : निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा निघणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी यावरून चांगलाच घणाघात केला आहे.

नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे गट आणि मनसेच्या आगामी निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, “अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे महाराष्ट्रात काम करत आहेत,” असे विधान केले आहे.

नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के?

नरेश म्हस्के यावेळी म्हणाले, “निवडणूक आयोग आणि आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जे आंदोलन उभारले जात आहे. महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाला. त्याच्या मागचे कारण ज्ञानेश कुमार सांगितलं जातं आहे. मुळात तेव्हा ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त नव्हते. त्यांचा पराभव का झाला यासाठी संजय राऊत यांनी आयोग नेमला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी ‘मी का हरलो?’ याचे आत्मपरीक्षण करावे. राज ठाकरे यांना जर मी तूच्छ वागणूक दिली नसती म्हणून पराभव झाला, हे उद्धव ठाकरे यांना कळेल,” अश्या शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्यावरदेखील त्यांनी यावेळी सडकून टीका केली. ते म्हणाले, “दिपके यांचे दिल्लीतील आंदोलन आपण पाहिले. सगळ्या डाव्या पिलावळी तिथे होत्या. ज्यांनी कायम हिंदुत्वाचा कायम विरोध केला. त्यांच्यासोबत ठाकरे बंधू हातमिळवणी करणार का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“दिपकेंच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे काम करतात”

“स्वतःचे अस्तित्व टिकवण्याकरिता अभिजित दिपके या काल आलेल्या पोरासोबत त्यांना हातमिळवणी करावी लागते याचे वाईट वाटते,’ असे म्हणत ‘शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला अभिवादन करून आंदोलन सुरू करण्यास ठाकरे यांनी दिपके यांना सांगावे,’ असे आवाहनदेखील नरेश म्हस्के यांनी यावेळी केले. सध्या अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे महाराष्ट्रात काम करत आहेत, असा टोलादेखील त्यांनी यावेळी मारला.

इंडिया आघाडीच्या बैठकीवरूनही नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. उद्धव ठाकरेंना आमदार-खासदार सांभाळण्यासह इतर कामं असल्याने बैठकीला सर्वजण उपस्थित राहतीलच असं नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे ४ ऑक्टोबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.

Gyanesh Kumar Impeachment Motion: आता ज्ञानेश कुमारांची खैर नाही; विरोधी पक्षांकडून मोठ्या कारवाईसाठी हालचाली सुरू

Web Title: Naresh mhaske attack uddhav thackeray raj thackeray election commission march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • election commission of india
  • Naresh Mhaske
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
1

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
2

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
3

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.