Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : अरे हा माणूस आहे की शैतान! नवऱ्याला खोलीबाहेर ठेवून भोंदू बाबा खरातचा गरोदरबाईवर अत्याचार, गुन्हा दाखल

तथाकथित आध्यात्मिक गुरू आणि स्वतःला 'बाबा' म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. खरातविरोधात आता लैंगिक अत्याचाराचा आणखी एक अत्यंत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 22, 2026 | 05:29 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक चव्हाट्यावर
  • पीडित महिला गर्भवती असताना असहायतेचा फायदा घेऊन अघोरी कृत्य
  • संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी
Ashok Kharat Case : नाशिकमध्ये सध्या खळबळ माजली आहे. तंत्र-मंत्र व अघोरी विद्येचा धाक दाखवून महिलांवर बलात्कार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण बरंच तापलं आहे.  तथाकथित आध्यात्मिक गुरू आणि स्वतःला ‘बाबा’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात आता लैंगिक अत्याचाराचा आणखी एक अत्यंत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पीडित महिला गर्भवती असताना तिच्या असहायतेचा फायदा घेऊन या नराधमाने अघोरी कृत्य केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण पेटलं! तृप्ती देसाई आणि चाकणकरांमध्ये ‘कोट्यवधींची डील’?; रूपाली ठोंबरेंचा थेट आरोप

अघोरी कृत्ये आणि अमानवीय अत्याचार

तक्रारीनुसार, पीडित महिला जेव्हा गर्भवती होती, तेव्हा तिला ‘दोष निवारण’ आणि ‘पूजा विधी’च्या नावाखाली अशोक खरातकडे नेण्यात आले होते. यावेळी खरातने पीडितेच्या पतीला खोलीबाहेर बसवून आतमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचं समोर आलं आहे. इतकेच नव्हे, तर तो लोकांना घाबरवण्यासाठी नकली साप आणि नकली वाघाच्या कातड्याचा वापर करायचा. या वस्तू दाखवून तो ‘अघोरी शक्ती’ असल्याचे भासवायचा आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करायचा असे प्रकार समोर येत आहे.

कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

या नराधमाची दहशत इतकी होती की, त्याने पीडितेने कोणाकडे तोंड उघडल्यास तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली होती. अघोरी कृत्यांच्या जोरावर तो पीडितेच्या मनात सतत भीती निर्माण करत असे. मात्र, खरातचे खरे रूप समोर येऊ लागल्यानंतर पीडितेने धीर एकवटून सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत पोलिसांकडे तक्रार केली.

कडक कलमांखाली गुन्हा दाखल

अशोक खरातच्या या कृत्यांची दखल घेत पोलिसांनी त्याच्यावर केवळ लैंगिक अत्याचाराचेच नाही, तर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Anti-Superstition and Black Magic Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमध्ये धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदू बाबाच्या अटकेनंतर आता आणखी किती पीडिता समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा कोणत्याही भोंदूगिरीला बळी पडू नका आणि अन्याय झाला असल्यास न घाबरता पुढे येऊन तक्रार दाखल करा असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

Nashik News : मंदिराच्या आडून कुकर्माचा आरोप; बाबा खरातला फाशी द्या, मिरगावात संताप

Web Title: Nashik ashok kharat case fake booked for physically assault on pregnant woman marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
3

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
4

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.