Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद; लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे; भाजपची काँग्रेस भवनसमोर निदर्शने

दिल्लीतील संसद भवनासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ शहरात काँग्रेस आणि मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे भाजपने राहुल गांधी फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप करत आंदोलन केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2026 | 11:21 AM
दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद; लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे; भाजपची काँग्रेस भवनसमोर निदर्शने

दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद; लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे; भाजपची काँग्रेस भवनसमोर निदर्शने

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली घटनेचे नाशकात पडसाद
  • लाठीचार्जविरोधात काँग्रेस, मनसेचे धरणे
  • भाजपची काँग्रेस भवनसमोर निदर्शने
नाशिक : दिल्लीत संसद भवन समोर सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्त बुधवार (दि.२२) शहरात आंदोलन वॉर दिसून आले. काँगेस व मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर दुसरीकडे भाजपने शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस विरोधात आक्रमक होत एमजी रोड येथे आंदोलन करून राहुल गांधी फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप केला. त्यामुळे दिवसभर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.

पारदर्शक परीक्षा व्यवस्थेची मागणी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशातील हजारों विद्यार्थी दिल्लीत आंदोलन करत आहे. प्रशासनाने बळाचा वापर करून उपोषण कर्ते सोनम वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून हटवले. त्यानंतर संसद भवन समोर लोकशाही मार्गाने निघणाऱ्या मोर्चातील निष्पाप विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी आंदोलनस्थळावरून उचलून नेत चुकीची वागणूक दिल्याच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शहर काँग्रेसने रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

Sonu Nigam: ‘शी… अशा कलाकारांना लाज वाटली पाहिजे’; विद्यार्थी आंदोलनावर सोनू निगमचं वक्तव्य चर्चेत; सोशल मीडियावर संतापाची लाट

कार्यकर्त्यांनी दिलेल्या मोदी सरकारविरोधात घोषणांनी दुमदूमला परिसर

नहीं, चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, दिल्ली सरकार हाथ हाथ, मोदी सरकार निकामी है, ये सरकार बदलनी है. राजीनामा राजीनामा द्या राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, अशी घोषणाबाजी यावेळी करीत आणि हातामध्ये साविधांची प्रत, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, छत्रपती शिवाजी महाराज व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा फोटो झळकावत केंद्रीय शिक्षण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसतर्फे प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, उध्दव पवार, ज्ञानेश्वर काळे, अरुण दोंदे, जयेश पोकळे, विजय राऊत सुदेश मोरे, संदीप वाध, ज्युली डिसुझा, रमेश जावव, भारत पाटील, विजय पाटील, जाकीर अत्तार, दत्ता सोनवणे, समाधान बागुल तर मनसेकडून स्तनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोबडे, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, किरण खाडम, शहर निरीक्षक विजय रानाते, सत्यम खंडाळे आदी उपस्थित होते.

आंदोलकांचा रास्तारोको

मनसे व काँग्रेसच्या वतीने सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन सुरु होते. मात्र अचानक संतप्त झालेल्या आंदोलकांनी रस्ता रोको अडविल्याने सीबीएसच्या वाहनांची काही काळासाठी मोठी कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत आआंदोलकाना रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून देत वाहनांना वाट करून दिली.

नीट पेपर फुटीनंतर लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले, जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. निष्पाप तरुणावर लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी दिली.

केंद्रातील मोदी सरकार हे मस्तवाल सरकार असून त्यांना त्याची जागा दाखवली पाहिजे, लाठीचार्ज वेळी मुलीनी व विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना देखील चुकीची वागणूक देताना आली. त्याचा आम्ही निषेध करतो. विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, अशी माहिती काँग्रेस शहराध्यक्ष बबलू खैरे यांनी दिली.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक उपोषण मागे घेणार? सरकारला पत्र लिहून ठेवली महत्त्वाची अट, म्हणाले…

Web Title: Delhi student lathicharge protest congress mns demand dharmendra pradhan resignation bjp targets rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • CJP Protest
  • Cockroach Janta Party
  • Nashik
  • police

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प
1

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
2

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
3

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
4

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.