Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुम्हाला कामं करणारी की स्थगिती…”; देवेंद्र फडणवीसांची विरोधकांविरुद्ध जोरदार फटकेबाजी

राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारसभा घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2024 | 06:47 PM
"तुम्हाला कामं करणारी की स्थगिती..."; देवेंद्र फडणवीसांची विरोधकांविरुद्ध जोरदार फटकेबाजी

"तुम्हाला कामं करणारी की स्थगिती..."; देवेंद्र फडणवीसांची विरोधकांविरुद्ध जोरदार फटकेबाजी

Follow Us
Follow Us:

नाशिक: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारसभा घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. देवयांनी फरांदे, सीमा हीरे आणि राहुल ढीकले यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.

आपल्या भाषणात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज आपण निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत. २०१४ मध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नाशिकचा चेहरा बदलण्याचे काम हातात घेण्यात आले. आता पुन्हा एकदा कुंभमेळा येत आहेत. जेवढा लागेल तेवढा पैसे आपले सरकार नाशिकसाठी देईल. चालू असणारी कामे देखील स्थगित करण्याचे काम महाविकास आघाडीने त्यांच्या काळात केले.आयटी हब असणाऱ्या पुण्यात आणि नाशिकसाठी आपण हायस्पीड ट्रेन सुरू करणार आहोत. नाशिक विमानतळ आपल्याची सरकारने सुरू केले आहे.”

“तुम्हाला काम करणारी लोक हवी आहेत की स्थगिती आणणारी लोक हवी आहेत? तर भाजपा आणि महायुती ही काम करणारी बाजू आहे. महायुतीने  राज्यातील प्रत्येक समाजासाठी काम केले आहे. जोवर महिला या आर्थिक, सामाजिक दृष्ट्या सक्षम होणार नाहीत, त्याशिवाय आपला देश विकसित भारत होणार नाही.”

कंपन्या बाहेर गेल्या हा ‘फेक नॅरेटिव्ह’….

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप वारंवार शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून केला जात आहे.  मात्र हा आरोप धादांत खोटा असून हे दोघे ‘फेक नेरेटिव्ह’ची फॅक्टरी आहे. गेल्या काही काळात असेही सांगितले गेले की हिंजवडीतील 36 कंपन्या बाहेर गेल्या याची मी माहिती घेतली. त्यानंतर असे दिसून आले महाविकास आघाडीच्या काळात 19 कंपन्यांनी आपले नवीन कॅम्पस सुरू केल. त्यांनी फक्त आपला विस्तार दुसरीकडे केला. पण तो विस्तार महाराष्ट्राच्या बाहेर  केला नाही. या  ‘फेक नेरेटिव्ह’ च्या फॅक्टरीला मी सांगू इच्छितो 2014 ते 2019 मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो .या काळात परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. 2020 -21 मध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आज देशांतर्गत गुंतवणुकीची तुलना केल्यास कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र यांची गुंतवणूक 48 टक्के आहे.मात्र एकट्या महाराष्ट्राची गुंतवणुक 52 टक्के आहे. हे आकडे आरबीआयने जाहीर केलेले आहेत.

मायक्रोसॉफ्टमुळे ५० हजार नोकऱ्यांची संधी…

देवेंद्र फडणवीस म्हणाले खरे तर खरे तर महाराष्ट्राची ही प्रगती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगायला हवी होती. मात्र रोज उठून हेच नेते महाराष्ट्र मागे पडत असल्याच्या फेक नेरेटिव्हला सेट करतात. गुजरातची भोंगे लावून प्रसिद्धी करतात. आगामी काळात पुणे जिल्ह्यामध्ये ऑटोमोबाईल आणि ईव्ही इन्वेस्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. मायक्रोसॉफ्टने महाराष्ट्रात युनिट सुरू केले असून या माध्यमातून पन्नास हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांना येथे हिवाळी अधिवेशनातच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Web Title: Devendra fadanvis take election rally for mahayuti candidates nashik maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 06:38 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti
  • Nashik

संबंधित बातम्या

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
1

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’
2

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’
3

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.