Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : धक्कादायक! ३८ कोटी खर्चुनही पिण्यासाठी गटारीचे पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

इगतपुरी शहरात दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ३८ कोटी रुपये खर्चुनही नागरिकांना दुषित पाणी पिण्यासाठी मिळत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 22, 2026 | 05:28 PM
३८ कोटी खर्चुनही पिण्यासाठी गटारीचे पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात (फोटो सौजन्य-Gemini)

३८ कोटी खर्चुनही पिण्यासाठी गटारीचे पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:

इगतपुरी : अनेक वर्षापासून जीर्ण झालेल्या पाईपलाईनमध्ये गटार, नाल्याचे व शौचालयाचे घाण पाणी शिरत आहे. नव्या आणि जुन्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे दुषित पाणी पुरवठा होत असून, शहरात साथीचे आजार पसरले आहेत. अनेक नागरिकांना वांत्या जुलाब, अतिसारसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ३८ कोटी रुपये खर्चुनही नागरिकांना दुषित पाणी पिण्यासाठी मिळत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.

NMC Election 2026 : फेरमतमोजणी पुन्हा होणार? नाशिकच्या प्रभाग २७ च्या अधिकाऱ्यांवर आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप

पावसाचे माहेरघर संबोधल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरात नगरपरिषदेचा तलाव व तळेगाव डॅममधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र प्रत्येक वर्षी मार्च व एप्रिल महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासत असल्याने सन २०१८ मध्ये भावली डॅमचे पाणी शहरात आणण्यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि गत सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून ३८ कोटी रुपये निधी आणला. पाईपलाईंचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने केलेली पाईपलाईन इस्टीमेंटप्रमाणे न टाकता काही ठिकाणी जुन्याच पाईपलाईनला जोडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी लोखंडी पाईप न वापरता रबरी व प्लास्टीक पाईप वापरल्याने अनेक वेळा पाईपलाईन फुटून पाणी वाया गेल्याचे
दिसून आले आहे. तर नळ जोडणी करतेवेळी प्लास्टीकचे पाईपलाईन दिल्याने अनेक ठिकाणी पाईप लिकेज आहे तर काही ठिकाणी जुन्याच पाईपलाईनला मुख्य पाईपलाईन जोडली आहे.

शहराला पाणीपुरवठा करतांना पाण्याचे जलशुद्धीकरण होत नसल्यामुळे नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. तरीही पाणीपट्टी वसुलीचा धाक ठेवून प्रशासन मनमानी करीत आहे. वेळीच ठेकेदाराने नाल्या, गटार व शौचालयाजवळील पाईपलाईन बदली केली नाही तर नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची नगरपरिषद प्रशासन काळजी घेतील का? की फक्त पाणीपट्टी, घरपट्टी पठाणी वसुली करतील असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.

काम अपूर्ण असतानाच देयके केली अदा

शहराला पाणीपुरवठा करणारी ही योजना पूर्ण झालीच नाही, मात्र ठेकेदाराने तत्कालीन मुख्याधिकारी यांना हाताशी धरून पूर्ण बिल वसूल केले. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी शहरातील पाईपलाईन पूर्ण झाल्याचे पाहिलेच नाही. तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असून, केवळ कागदावरच पूर्ण झाल्याचे दाखवले आहे.

Nagpur Crime: बुधवार ठरला घातवार! नकारातून तरुणीचा खून, रामझुला पुलाखाली अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या

Web Title: Even after spending 38 crores in igatpuri residents health is at risk due to water from drainage for drinking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Water Issue

संबंधित बातम्या

Maharashtra Mayor Reservation : महाराष्ट्रात महिलांचे वर्चस्व; २९ पैकी १५ महापालिकेवर ‘महिला राज’
1

Maharashtra Mayor Reservation : महाराष्ट्रात महिलांचे वर्चस्व; २९ पैकी १५ महापालिकेवर ‘महिला राज’

Housing Schemes: ७२० लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर; घरकुलासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर
2

Housing Schemes: ७२० लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर; घरकुलासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर

Karjat News : लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा
3

Karjat News : लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले
4

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.