Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! नाशिक-मुंबई महामार्गावरील हॉटेल्समधून पनीर गायब; बोगस पनीरच्या चर्चेने खवय्ये सावध

नाशिक-मुंबई महामार्गावरील अनेक हॉटेल्समधून अचानक पनीर पदार्थ गायब झाल्याने खवय्य्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोगस किंवा निकृष्ट दर्जाच्या पनीरच्या चर्चेमुळे काही हॉटेल्सनी खबरदारीचा उपाय म्हणून पनीर पदार्थ तात्पुरते बंद केल्याची चर्चा असून, अन्नसुरक्षेबाबत ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 16, 2026 | 03:12 PM
नाशिक-मुंबई महामार्गावरील हॉटेल्समधून पनीर गायब; बोगस पनीरच्या चर्चेने खवय्ये सावध

नाशिक-मुंबई महामार्गावरील हॉटेल्समधून पनीर गायब; बोगस पनीरच्या चर्चेने खवय्ये सावध

Follow Us
Follow Us:
  • नाशिक-मुंबई महामार्गावरील हॉटेल्समधून पनीर गायब
  • बोगस पनीरच्या चर्चेने खवय्ये सावध
  • आतापर्यंत नेमके कोणते पनीर विक्री व्हायचे?
इगतपुरी : नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवरील मेन्यू कार्डवरून सध्या ‘पनीर’चे पदार्थ अचानक गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, काही हॉटेल चालकांनी पनीरच्या भाजीमागे थेट ३० ते ४० रुपयांची दरवाड केल्याने ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ‘बोगस पनीर’ तयार होत असल्याची चर्चा रंगली असतानाच, अचानक निर्माण झालेल्या या टंचाईमुळे प्रवाशांमध्ये आणि खवय्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत आपण नेमके काय खात होतो? गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे पनीर तयार करून ते बाजारात विकले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Nashik Crime: लग्नासाठी हट्ट धरला, कुटुंबीयांनी होकार दिला अन् दुसऱ्याच दिवशी प्रियकराचा खून

आतापर्यंत नेमके कोणते पनीर विक्री व्हायचे?

काही व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांना अत्यंत कमी दरात या पनीरचा पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली होती, मात्र, ही बाब चव्हाट्यावर येताच अनेक ठिकाणच्या खानावळी आणि ढाब्यांवरून पनीरचे पदार्थ मिळणे बंद झाले आहे. पनीर बटर मसाला, कढ़ाई पनीर, पनीर टिक्का यांसारख्या लोकप्रिय पदार्थाची मागणी करणाऱ्या ग्राहकांना पनीर उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण नेमके काय खात होतो? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

संशयाची सुई अधिक गड

शहरासह संपूर्ण तालुक्यात दररोज क्विंटलच्या पटीत पनीरची विक्री होते. मात्र, या पनीरचा मुख्य पुरवठादार कोण? त्याची गुणवता तपासली जाते का ? उत्पादकांकडे अन्न सुरक्षा विभागाचे परवाने आहेत का? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. जर बाजारात खरोखरच दर्जेदार पनीर येत होते, तर अचानक हा तुटवडा का निर्माण झाला? की कारवाईच्या भीतीने बोगस पनीरचे कारखाने भूमिगत झाले आहेत? अशा अनेक प्रश्नांमुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाला आहे. इतकी मोठी चर्चा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही, अन्न व औषध प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. संशयास्पद कारखान्यांवर छापे टाकणे, पनीरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणे किंवा विक्रेत्यांची चौकशी करणे, अशी कोणतीही मोठी मोहीम तालुक्यात राबवली नसल्याचे दिसते आहे.

Maharashtra politics : नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपाचा व्हीप जारी; ५२ नगरसेवक सहलीसाठी रवाना

 

Web Title: Fake paneer fear nashik mumbai highway hotels paneer missing 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • food news
  • Nashik
  • paneer

संबंधित बातम्या

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
1

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
2

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
3

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
4

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.