
Nashik, Kumbh Mela, Girish Mahajan,
स्वतंत्र कुंभमेळ्यासाठी शासनाने प्राधिकरण स्थापन केले असून, त्यात पाच आयएएस अधिकारी कार्यरत आहेत, त्यामुळे कुंभमेळ्याशी संबंधित निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होत असताना, या कथित टोळीने प्रशासनाच्या नावाचा गैरवापर करून बनावट ऑफलाईन ऑर्डर्स तयार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांना दोन्ही वेळचे जेवण पुरविणे, विविध साहित्य पुरविणे अशा स्वरूपाच्या १०० ते १५० कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर्स तीन ते चार कंत्राटदारांना देण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, या ऑर्डसंबाबत संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांनी स्वतःहून प्रशासनाकडे तक्रार केली. या कथित बनावट ऑर्डर्स मिळवून देण्यासाठी संबंधितांकडून रोख रक्कम तसेच धनादेशाद्वारे पैसे उकळण्यात आले.
या प्रकाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, अशा प्रकारच्या कोणत्याही कामाची किंवा कमिशनची मागणी अधिकृतपणे केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच, शासनाच्या अधिकृत प्रक्रियेचा आधार घेतल्याचा आभास निर्माण करून कंत्राटदारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा हा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
पोलिसाना ७० दिवस दोन्ही वैळचे जेवण पुरविणे
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणे
पोलिसांना बॅरिकेड्स पुरविणे
पोलिसांना हाऊसकीपिंग सेवा देणे