Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra politics : नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपाचा व्हीप जारी; ५२ नगरसेवक सहलीसाठी रवाना

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील भाजपाच्या ५२ नगरसेवकांना पक्षादेश (व्हीप) बजावत विशेष बसेसमधून ठाण्याकडे सहलीसाठी रवाना करण्यात आले. मात्र, २० नगरसेवकांनी विविध कारणांमुळे जाण्यास नकार दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 16, 2026 | 11:11 AM
नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपाचा व्हीप जारी; ५२ नगरसेवक सहलीसाठी रवाना

नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपाचा व्हीप जारी; ५२ नगरसेवक सहलीसाठी रवाना

Follow Us
Follow Us:
  • भाजपचे ५२ नगरसेवक बसने सहलीसाठी रवाना
  • वीस सदस्य गैरहजर
  • गटनेत्यांनी बजावला व्हीप
नाशिक : विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ५२ नगरसेवकांनी सोमवारी (१५ जून 2026) अखेर सहलीसाठी तयार होवून दुपारनंतर ठाण्याकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष सुनील केदार यांनी काढलेला पक्षादेश (व्हीप) गटनेते अॅड. श्याम बडोदे यांनी सर्व नगरसेवकांना बजावला. तरीही २० नगरसेवकांनी विविध कारणास्तव सहलीसाठी रवाना होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक अद्यापही नाशकातच असून, मंगळवारी या संदर्भातील निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

नाशिकच्या जागेवर महायुतीची मोठी रणनीती! बच्चू कडूंच्या आंदोलनावर आणि उद्धव ठाकरेंच्या ‘ऑनलाईन’ उपस्थितीवर उदय सामंत कडाडले

विधान परिषदेसाठी गुरूवारी (१८ जून 2026) मतदान होणार असून, महायुतीतील शिंदेसेनेचे नगरसेवक शनिवारीच सहलीसाठी रवाना झाले. मात्र भाजपाच्या नगरसेवकांचे ठरत नव्हते. मंत्री गिरीष महाजन हे नाशकात येतील व त्यानंतरच त्याबाबतचा निर्णय होईल असे सांगितले गेले. परंतु महाजन आले नाहीत. अखेर सोमवारी (दि. १५) महापालिकेची महासभा आटोपल्यानंतर नगरसेवकांना एका हंटिलमध्ये पाचारण करण्यात आले व तेथे शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते श्याम बडोदे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक होवून त्यात त्यांना पक्षादेश (व्हीप) बजावण्यात आला. दुपारी जेवणानंतर विशेष बसेसमधून ५२ नगरसेवकांना रवाना करण्यात आल्याची माहिती गटनेते अॅड. श्याम बडोदे यांनी दिली.

महिला नगरसेवकांबरोबर पती, मुलांचीही सहल

महापालिकेत भाजपाचे ७२ सदस्य असून, त्यातील ५२ नगरसेवक रवाना झाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. तर २० नगरसेवकांनी विविध कारणास्तव सहलीसाठी जाण्यास अनुत्सूकता दर्शविली. मात्र ते पक्षाबरोबरच असल्याचेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, काही महिला नगरसेवकांबरोबर त्यांचे पती व मुलेही सहलीसाठी रवाना झाले तर काहींना बसमध्ये जागा न मिळाल्याने त्यांनी खासगी वाहनानेच सहलीसाठी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर काही नगरसेवक शेवटच्या दिवशी कॅम्पमध्ये दाखल होणार आहेत.

राष्ट्रवादीचे अजून जमेना

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक अजूनही शहरातच आहेत. राष्ट्रवादीचे चार व एक अपक्ष असे पाच सदस्य आहेत. शिंदे सेनेकडून त्यांनाही शनिवारपासून गळ घालण्यात आली. परंतु त्यांनी दाद दिली नाही. सोमवारी आ. किशोर दराडे यांनी राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांची भेट घेतली असली तरी, राष्ट्रवादीचा निर्णय झालेला नाही, मंगळवारी या संदर्भात नगरसेवकांची बैठक होऊन त्यात निर्णय होवून नगरसेवक रवाना होतील असे पक्षाकडून सांगण्यात आले.

तडजोडीची चर्चा

गेल्या दोन दिवसांपासून शिंदे सेनेच्या होकाराला प्रतिसाद न देणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांना अखेर मतदानाचे मोल देण्याचा शब्द देण्यात आल्यानंतरच या नगरसेवकांनी सहलीसाठी होकार भरल्याची चर्चा होत आहे. त्यातही काही नगरसेवकानी नुकसान होत असल्याचे सांगून नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. मात्र शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व स्वतः उमेदवाराने प्रत्येकाशी संपर्क साधून विनंती केल्यावर भाजप नगरसेवक राजी झाल्याचे सांगण्यात आले.

Maharashtra politics : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये

Web Title: Nashik bjp corporators tour thane mlc election whip june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Nashik

संबंधित बातम्या

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
1

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
2

Suvendu Adhikari Helicopter Emergency Landing: सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
3

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

NDA MPs Protest: आता राहुल गांधी पळू नका…! रांची विद्यार्थी लाठीचार्जवरून भाजप खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी
4

NDA MPs Protest: आता राहुल गांधी पळू नका…! रांची विद्यार्थी लाठीचार्जवरून भाजप खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.