Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kumbh Mela Scam: नाशिक कुंभमेळ्याचे सर्वांचे कमिशन फिक्स? मंत्रालयातील ‘त्या’ अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

विलास लाड हे राज्य सरकारच्या वित्त आणि नियोजन विभागात चेंबर ऑफिसर होते. त्यांना नुकतेच खारघरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) ६,३७,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 07, 2026 | 01:26 PM
Kumbh Mela Scam:  नाशिक कुंभमेळ्याचे सर्वांचे कमिशन फिक्स? मंत्रालयातील ‘त्या’ अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
Follow Us
Follow Us:
  • लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या विलास लाडची ऑडिओ क्लिप व्हयरल
  • नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १५,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी
  • कुंभमेळ्यासाठी १,०२१ प्रकारच्या कामांच्या निविदा आधीच व्यवस्थापित केल्या गेल्या
Vilas Lad On Nashik Kumbh Tender Scam: मंत्रालयातील सेक्शन ऑफिसर आणि लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या विलास लाड यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओमुळे राज्याचे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कुंभमेळाच्या निविदांसंदर्भात या ऑडिओ क्लिपमध्ये केलेले दावे एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या जाळ्याकडे निर्देश करतात.

लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात असलेल्या विलास लाड यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ते एका व्यक्तीशी नाशिक कुंभमेळाच्या निविदेबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या कमिशनबद्दल बोलताना ऐकू येत आहेत. या व्यवहारातून आपल्याला कोट्यवधी रुपयांचे कमिशन मिळेल, असा दावाही त्यांनी केल्याचे ऐकू येत आहे. पण आरोपी विलास लाड यांनी या फोन संभाषणात केलेले दावे खरे आहेत की खोटे, याला अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नवराष्ट्रने अद्याप या ऑडिओ क्लिपला दुजोरा दिलेला नाही.

Pune Crime: माणुसकीला काळिमा! दुसऱ्या लग्नासाठी आईकडून 11 महिन्यांच्या मुलाचा काढला काटा; पुण्यातील घटना

विकास लाड यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?

राज्य आणि केंद्र सरकारने नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १५,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या रकमेपैकी काही हजार कोटी रुपये आधीच मिळाले आहेत. या कथित फोन कॉलमध्ये, अटक केलेल्या आरोपी विलास लाड दावा करतो की, त्याच्या वाट्याला ५०० कोटी रुपये आले आहेत. आपण वैयक्तिकरित्या ७०० तंबू, तसेच ई-टॉयलेट्स आणि स्वच्छतेसाठी निविदा मिळवल्या असल्याचा दावाही त्याने यात केला आहे.

तसेच, मला कुंभमेळ्यातील सकाळच्या नाश्त्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी १८ कोटी रुपयांची निविदा मिळाली आहे. कुंभमेळा ४० दिवस चालतो आणि त्यात इतका खर्च येत नाही, त्यात मला मोठं कमिशन मिळणा आहे, असाही दावा विलास लाड याने केल्याचे ऐकू येत आहे.

मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमताचा दावा

विलास लाडचा दावा आहे की, ‘या ऑडिओ क्लिपमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कुंभमेळ्यासाठी १,०२१ प्रकारच्या कामांच्या निविदा आधीच व्यवस्थापित केल्या गेल्या आहेत. कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांसाठी कमिशनची टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे. तुमच्या ओळखीचे लोक असतील तर आम्ही त्यांनाही टेंडर्स मिळवून देऊ; यात लाखो-कोटींची कमाई होण्याची शक्यता आहे.” अशा ऑफर्सही त्याने दिल्या आहेत.

नाशिकचा दुसरा खरात! कार्यलयात सापडले 120 अश्लील व्हिडीओ अन् प्राण्यांचे अवयवही…; Ravindra Erande विरोधात धक्कादायक माहिती समोर

लाच घेताना रंगेहाथ अटक

विलास लाड हे राज्य सरकारच्या वित्त आणि नियोजन विभागात चेंबर ऑफिसर होते. त्यांना नुकतेच खारघरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) ६,३७,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ग्रामीण विकास विभागासाठी निधी मंजूर करण्याच्या बदल्यात ही लाच मागण्यात आली होती. छाप्यादरम्यान लाड यांच्या घरातून २ लाख रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली. सत्र न्यायालयाने विलास लाड यांना ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेने पुष्टी केली नसली तरी, यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

Web Title: Nashik kumbh mela tender scam arrested officer vilas lads alleged audio clip sparks controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Kumbh Mela
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
1

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Girish Mahajan Fake AI Photo: गिरीश महाजन यांचे बनावट फोटो व्हायरल करणारा आरोपी जेरबंद; AI ने तयार केले बनावट फोटो
2

Girish Mahajan Fake AI Photo: गिरीश महाजन यांचे बनावट फोटो व्हायरल करणारा आरोपी जेरबंद; AI ने तयार केले बनावट फोटो

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत
3

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय
4

Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.