Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?’ मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

नांदेडमधील विष्णुपुरी पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. मिसिंग लिंक दुर्घटनेवरील 'भाडे के तट्टू' वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या विकास दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Jul 09, 2026 | 09:02 PM
'नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?' मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

'नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?' मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेवरून राज्यभरात संतापाचे वातावरण असताना आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये याची पुनरावृत्ती झाली आहे. नांदेड शहरातील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली असून यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

मिसिंग लिंक दुर्घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण गरम असून विरोधकांनी यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात यावरून विरोधकांवर टीका करत विरोधक राजकारण करत असल्याचे सांगितले. तसेच याप्रकरणाबाबत बोलणार्यांना ‘भाडे के तट्टू’ म्हणत टीका केली होती यावरून आता हर्षवर्धन सपकाळांनी टीका करत “याविरोधात बोलणारे पण भाडे के तट्टू ठरणार का मुख्यमंत्री महोदय..?” असा सवाल उपस्थित केला आहे.

‘मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?’ राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली. ते म्हणाले, “आता याविरोधात बोलणारे पण भाडे के तट्टू ठरणार का मुख्यमंत्री महोदय..? नांदेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, पण हा अपघात सरकारच्या निष्काळजी कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे करतो.”

आता याविरोधात बोलणारे पण भाडे के तट्टू ठरणार का मुख्यमंत्री महोदय..? नांदेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, पण हा अपघात सरकारच्या निष्काळजी कारभारावर मोठे… pic.twitter.com/6IezDMsqGV — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) July 9, 2026

“नागपूर–सोलापूर महामार्गावरील नांदेडमधील रस्ते आणि पुलांची कामे गेली अनेक वर्षे रखडली आहेत. लाखो विद्यार्थी, रुग्ण, पालक आणि नागरिक धुळीचे रस्ते, वाहतूक कोंडी आणि निकृष्ट कामांचा त्रास रोज सहन करत आहेत. ज्या मार्गावर SGGS अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण पॉलिटेकनिक, सहयोग महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे, त्याच मार्गावरील ही दुर्घटना अधिक गंभीर आहे. ही फक्त पुलाची भिंत कोसळलेली नाही… सरकारच्या तथाकथित विकासाच्या दाव्यांची भिंत कोसळली आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर घणाघात केला.

फडणवीसांच्या वक्तव्याने नवा वाद

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुसळधार पावसानंतर मिसिंग लिंक प्रकल्पावरून खोटी माहिती पसरवली जात आहे. इतके खोटारडे लोक पैदा झाले आहेत, एक हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील,” असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, “महायुती सरकारने धाडस दाखवून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला. मागील सरकारने हा प्रकल्प शक्य नसल्याचे सांगत अनेक कारणे दिली होती,” असा दावाही त्यांनी केला.

राज ठाकरेंच्या टीकेला राम कदमांचा पलटवार; मिसिंग लिंक वादावर भाजप-मनसे आमनेसामने

सोशल मीडियावरील टीकेचा उल्लेख करत फडणवीस टीकाकारांना ‘भाडे के टट्टु‘ म्हणाले. “देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, चालेल. मी शिव्याप्रूफ आहे.” पुढील दहा वर्षांनी टीका करणारे दिसणार नाहीत, मात्र मिसिंग लिंक प्रकल्प आणि तो उभारणाऱ्या नेतृत्वाची नोंद इतिहासात राहील, असेही त्यांनी म्हटले. ट्रोलर्सवर निशाणा साधत ते म्हणाले, “पैसे घेऊन सोशल मीडियावर शिव्या देतात. माझी बदनामी करा, हरकत नाही; पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर कोणालाही सोडणार नाही,” असा इशारा दिला.

Web Title: Harshvardhan sapkal slams devendra fadnavis over nanded bridge wall collapse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Harshvardhan Sapkal
  • Mumbai Pune Missing Link
  • Nashik News

संबंधित बातम्या

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
1

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
2

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?
3

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
4

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.